मुंबादेवी तरूण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यामाने श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा
मुंबादेवी तरूण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यामाने श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा
कोपरगाव शहरात मुंबादेवी तरूण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यामाने श्री साई सच्चरित्र पारायण सोहळाचे आयोजन केलेले असुन, सालाबादप्रमाणे श्रावण मासा निमित्त गुरुवार दि. ४/८/२०२२ ते शुक्रवार दि. १२/८/२०२२ पर्यंत श्री साईसच्चरित्र पारायण सोहळा आरंभ होत आहे. सदर पारायण सोहळ्यास ज्यांना बसावयाचे आहे, त्यांनी आपली नावे दत्ता उदावंत : ९५९५९४२४९३, कुणाल लोणारी: ८७९३५३२६२८, संजय मंडलिक : ९८९०११८२७१यांच्याकडे नोदवावी.सदरचे साई चरित्र पारायण सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज (मठाधिपती, श्री संत जनार्दन स्वामी समाधीस्थान, बेट कोपरगांव) यांच्या शुभ हस्ते होणार असुन सुवर्णकार भवन, सराफ बाजार, कोपरगांव, जि. अ. नगर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. पारायणाची वेळ सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत असुन या निमित्ताने शुक्रवार दि. १२/०८/२०२२ रोजी श्री संत नरहरी विठ्ठल मंदिर, सराफ बाजार, कोपरगांव येथे महाप्रसादाचे वाटप होणार आहे.या महाप्रसाद आणि साईचरित्र पारायणाचा लाभ नागरिकांनीनागरिकांनी घ्यावा असे आवाहन मा. श्री. योगेश तुळशीदास बागुल,मा. उपनगराध्यक्ष, कोपरगांव नगरपरिषद कोपरगांव, यांनी केले आहे.
दहा लाख वाचक असलेल्या सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी या लिंकचा वापर करा
https://chat.whatsapp.com/JDIiuSdL0em4sJ8ITiKSeB




