धार्मिक

कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता

४७ व्या अखंड हरीनाम सप्ताह सांगता प्रसंगी काल्याची दही हंडी फोडतांना माजी आमदार अशोकराव काळे, ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव.

कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता

संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी – श्री. क्षेत्र खेडले झुंगे येथील परम पूज्य गुरुवर्य तुकारामबाबा यांच्या प्रेरणेतून कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कारखाना कार्यस्थळावर सुरु केलेल्या धार्मिक परंपरेतून सालाबाद प्रमाणे याहीवर्षी शनिवार दिनांक २३/०७/२०२२ ते शनिवार दिनांक ३०/०७/२०२२ या कालावधीत पार पडलेल्या ४७ व्या अखंड हरीनाम सप्ताह व भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. या सोहळ्याची सांगता नुकतीच हजारो भाविकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडली. या सप्ताह काळात अनेक नावाजलेल्या कीर्तनकारांचे कार्यक्रम झाले, सप्ताह सांगता समारंभ ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव यांच्या काल्याच्या किर्तनाने होवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते काल्याची दही हंडी फोडण्यात आली.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कोसाका सांस्कृतिक, शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज व श्री. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त दरवर्षी कारखाना कार्यस्थळावर सुरु केलेली अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा माजी आमदार अशोकराव काळे व व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ना.आशुतोष काळे यांनी पुढे सुरु ठेवली आहे. मात्र मागील दोन वर्ष कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता मात्र यावर्षी कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्यामुळे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सप्ताह काळात नियमित पणे सुरु असलेला हरिपाठ व रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तनाच्या कार्यक्रमाने सर्व परिसर भक्तीमय झाला होता. ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने बसले होते.काल्याच्या कीर्तन प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समुहाचे मुख्य मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ पदाधिकारी व सप्ताह कमिटीचे सदस्य तसेच हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे