सामाजिक

“अण्णा भाऊंचे आयुष्य म्हणजे संघर्षमय गाथा” – विश्वास पाटील

“अण्णा भाऊंचे आयुष्य म्हणजे संघर्षमय गाथा” – विश्वास पाटील

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव:-अण्णा भाऊ साठे यांनी संपूर्ण जीवनात संघर्ष अनुवला आणि आपल्या साहित्यातून रेखाटला असून अण्णा भाऊंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची गाथा आहे असे उद्गार जेष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.कोपरगाव येथे लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी मातंग समाजाच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण करण्यात आले कोपरगाव नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कै.वि. तू.बागुल दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कै मच्छीन्द्र राक्षे यांच्या स्मरणार्थ सागर आहेर यांना फकिरा युवा पुरस्कार तर शिर्डी येथील कै.प्रयोगाबाई त्रिभुवन यांच्या स्मरणार्थ मुक्ता साळवे शिक्षिका पुरस्काराने वैशाली उल्हारे यांना सन्मानित करण्यात आले या वेळी बोलताना विश्वास पाटील पुढे म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांनी जन सामान्यांच्या संघर्षाचे चित्रण आपल्या साहित्यात केले असून साहित्य क्षेत्रा बरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान दिले मात्र ते साहित्य क्षेत्राच्या सर्वोच्च सन्माना पासून वंचित राहिले याची खंत वाटते आपल्या प्रास्ताविक
भाषणात अँड. नितीन पोळ यांनी सांगितले की, महापुरुषांच्या शोषण मुक्त समाजकरिता लोक स्वराज्य आंदोलना च्या वतीने सामाजिक कार्यकर्त्याना प्रेरणा मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल होते तर आभार सोमनाथ म्हस्के यांनी व्यक्त केले कार्यक्रमास समता पतसंस्थेचे काका साहेब कोयटे,माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडने, शिर्डीचे कमलाकर कोते,सचिन खेडलेकर,पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,शरद त्रिभुवन निसार शेख,सुजल चंदनशिव,अकबर शेख,सोमनाथ अहिरे,विनोद वाकळे,प्रवीण शेलार,पी डी सोळसे,अँड.सोनल पोळ,राजेंद्र चंदनशिव,किरण सोळशे,सोमनाथ अहिरे,प्रवीण शेलार, सोमनाथ ताकवले, नितीन शिंदे,वाघिरे साहेब,जाधव साहेब रवी डोलारे आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे