सामाजिक

“पुरस्कारार्थी च्या नावाने पुरस्कार मोठा झाला”- अँड.नितीन पोळ

“पुरस्कारार्थी च्या नावाने पुरस्कार मोठा झाला”- अँड.नितीन पोळ

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव:-एखाद्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला जातो मात्र कोपरगाव नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दादा पाटील यांना दलित मित्र पुरस्कार दिल्याने पुरस्कार मोठा झाला अशी भावना लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने नुकतीच कोपरगाव येथे जेष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या उपस्थिती सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १०२ जयंती साजरी केली या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजात काम करणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या नावे पुरस्कार देण्याचे ठरले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र शासनाने अण्णा भाऊ साठे दलित मित्र पुरस्काराने गौरविण्यात आलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै.वि.तू. बागुल यांच्या नावाने दलित मित्र पुरस्कार जाहीर केला कोपरगाव शहराच्या जडण घडणीत व विकासाची दृष्टी असलेले नाव म्हणून माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे नाव सर्वात पुढे आले कोपरगाव शहरात अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवताना त्यावेळी मंगेश पाटील यांचे वडील माधवराव पाटील यांच्या देखरेखी खाली सदर पुतळ्याचे काम जेष्ठ नेते कै. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी करून घेतले होते तर त्यांच्या देखरेखी त शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला होता कोपरगाव नगर पालिकेत गट नेते असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला होता त्यांच्याच काळात अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा ठराव झाला होता एका कार्यक्रमात दलितांवरील अन्याय अत्याचारवर मत व्यक्त करताना अत्यंत भावनिक होऊन मंगेश पाटील यांनी सुवर्ण दलित वाद होऊ नये म्हणून प्रयत्न करणार असे म्हटले होते कै वि.तू.बागुल ,कै मच्छीन्द्र राक्षे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव येथे माजी मंत्री कै शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथे अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवला होता त्यांच्या नावाने नवीन कार्यकर्त्याना प्रेरणा मिळावी म्हणून पुरस्कार देताना मनस्वी आनंद झाला त्यातल्या त्यात मंगेश दादा पाटील यांना हा पुरस्कार दिल्याने हा पुरस्कार खूप मोठा झाला असून मंगेश पाटील यांची या पुरस्कारा साठी निवड केल्याने अनेकांनी लोक स्वराज्य आंदोलनाचे कौतुक केले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे