बहुजन भीम पँथर सेना( बहुजन एकता मिशन) या सामाजिक संघटनेचा प्रथम वर्धापन दिन समाजभूषण पुरस्कार देऊन साजरा

बहुजन भीम पँथर सेना( बहुजन एकता मिशन) या सामाजिक संघटनेचा प्रथम वर्धापन दिन समाजभूषण पुरस्कार देऊन साजरा
बहुजन भीम पँथर सेना या सामाजिक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त बहुजन समाजामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या विविध संघटना विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांना एकत्र आणत एकाच स्टेजवर समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या पक्ष संघटनेत जरी असले तरीही सर्वांची विचारधारा एक…. सर्वांचे उद्देश एक आहे… पण सर्वजण एकत्र नाहीत… हीच फार मोठी शोकांतिका आहे…सर्वांना एकत्र करून एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एकत्र लढा..असा महान आणि दिशादर्शक संदेश बहुजन भीम पँथर सेना संस्थापक अध्यक्ष इब्राहिमभाई शेख यांनी या वर्धापन दिनानिमित्त तमाम समाजबांधवांना दिला आहे.

सर्वप्रथम कोपरगाव येथे सर्व महापुरुषांना अभिवादन करून रॅली कोपरगाव ते चासनळी पर्यंत वाद्यासह आणण्यात आली फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये संभाजी प्रतिष्ठान शिर्डी चे अध्यक्ष विनोद भाऊ अहिरे भीम आर्मीचे दीपक भाऊ भालेराव आजाद समाज पार्टीचे ऋषिकेश पोळ वंचित बहुजन आघाडीचे शरद भाऊ खरात अनिल बनसोडे भीम आर्मीचे श्याम भाऊ जाधव वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण भाऊ अल्हाट समता सैनिक दलाचे मेहेरखांब मोतीराम भाऊ निकम बामसेफ चे राजु दिवेकर निसार भाई शेख स्वतंत्र बहुजन विज कर्मचारी संघटनेचे सिताराम खडांगळे, अनिरुध्द पगारे आदी मान्यवरांना कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक प्रमोद जी अण्णा लबडे साहेब यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य टीम जिल्हा टीम कोपरगाव येवला निफाड राहुरी राहता श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणचे सर्व भीमसैनिक बहुजन भीम पँथर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते संघटनेचा एक वर्षाचा कार्यकाल कसा होता याचा सविस्तर वृत्तांत संस्थापक अध्यक्ष यांनी देऊन संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत पुढेही यापेक्षा जोमाने कार्य करावे अशी अपेक्षा बाळगून त्यांचे मनोबल वाढवले त्यावेळेस महिला आघाडी टीम यांचेही त्यांनी आभार मानले


