कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न
श्रीगणेश उत्सव अनुशंगाने शांतता समीती सदस्य, श्रीगणेश मंडळ अध्यक्ष, सदस्य प्रतिष्ठीत नागरिक, डि जे. चालक मालक व पोलीस पाटील यांची मुख्याधिकारी शांताराम गोसावी, सहाय्यक अभियंता . अतुल खंडारे म.रा.वि.वि.कं. तहसिदार प्रतिनिधी नायब तहसिलदार . पी. डी. पवार यांचे उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करणे बाबत शुभेच्छा देत लोकांना त्रास होणार नाही याबाबत विशेष काळजी घेणे बाबत सुचना दिल्या तसेच पर्यावरण पुर्वक गणेश मुर्तीचा वापर करणे, पर्यावरण पुर्वक सजावट, समाज प्रबोधन या विषयावर विचारावर देखावे, स्वांतत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावे, रक्तदान शिबीर, वैद्यकिय सेवा शिवीर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्य, पारंपारिक संस्कृतीक कार्यक्रम पारंपारिक खेळाच्या स्पर्धा असे कार्यक्रम आयोजीत करणे बाबत तसेच ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घेवुन शासकिय नियमांचे पालन करून गणेशउत्सव साजरा करणे बाबत सुचना देवून मार्गदर्शन केले. तसेच उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळाना प्रथम, व्दितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ असे पाच बक्षीसे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व नगरपालिका कोपरगाव यांचेकडुन संयुक्तीक देण्यात येणार असले बाबत घोषीत केले आहे. सदरची शांतता कमीटी व गणेश मंडळाची बैठक ही मा. पोलीस अधिक्षक . मनोज पाटील सो. अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, श्रीरामपुर विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी . संजय सातव ,यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले कोपरगाव शहर पोस्टे यांनी आयोजीत केली आहे.सदरच्या बैठकीस पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, सहाय्यक अभियंता . अतुल खंडारे म.रा.वि.वि.कं, तहसिदार प्रतिनिधी नायब तहसिलदार . पी. डी. पवार, जिल्हा परिषद सदस्य . राजेश परजणे, फादर प्रमोद बोधक, नारायण अग्रवाल, प्रा. संतोष पगारे के. जे. एस. कॉलेज कोपगरगाव, अस्लम शेख, बाळासाहेब रुईकर, अनिल गायकवाड, संतोष गंगवाल, भरत मोरे, विजय आढाव, फ्रेंडी जोसेफ फर्नांडीस, वायु काकडे, यांचे सह ६० ते ७० गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य, डी जे चालक मालक शांतता समीतीचे सदस्य व महिला दक्षता समीतीचे सदस्या श्रीमती विमल खांबेकर, श्रीमती जोत्स्ना पगारे, सी. तसनीम आयुब पठान, अडव्होकेट पी. व्ही पाटनी, श्रीमती स्वाती मुळे, डॉ. सौ अर्चना मुरुमकर पोलीस पाटील, पोलीस अधिकारी व सर्व अंमलदार असे उपस्थित होते.



