धार्मिक

येणाऱ्या काळात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज- ढाकणे

येणाऱ्या काळात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज- ढाकणे

कोपरगाव- सध्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून प्रदूषणाने धुमाकूळ घातला असताना कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी देखील कोपरगाव नगरपालिकेच्या गेल्या कित्येक वर्षाच्या ढिसाळ व बेजबाबदार पणाच्या नियोजनामुळे गोदावरी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून या प्रदर्शित झालेल्या नदीत आपल्या पवित्र गणरायाचे व देवी मूर्तीचे विसर्जन न करता आपल्या देव-देवतांचे पावित्र्य राखावे तसेच येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात सर्वांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा अशी विनंती गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ ढाकणे यांनी सर्व गणेश भक्तांना आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी देखील आपल्या विभागातील सर्व महानगरपालिकेच्या आयुक्तांना व नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देखील २६ ऑगस्ट २०२२ च्या पत्रकाद्वारे माझी वसुंधरा व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना करण्याचा सूचना देत मार्गदर्शन केले आहे.ढाकणे यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी पात्रात कोपरगाव नगरपालिकेद्वारे शहरातील वेगवेगळ्या गटारी द्वारे मैलायुक्त पाणी व अवैद्य कत्तलखान्यात कापलेल्या जनावरांच्या रक्त व मांसाचे तुकडे देखील नदीपात्रात मिक्स होत असून यामुळे नदीपात्र मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झाले असून त्यामुळे या अपवित्र नदीच्या पाण्यात आपल्या गणपती बाप्पाचे व इतर देवी-देवतांच्या मूर्तींचे विसर्जन न करता ते आपल्या विहिरीत, तळ्यात अथवा कृत्रिम तळ करून त्यात विसर्जित करावी.तसेच येणाऱ्या काळात गणेशोत्सव साजरा करताना पारंपारिक गणेश मूर्तीची स्थापना करण्याऐवजी घरात असलेल्या देवघरातील धातूंची किंवा संगमरवरी मूर्तीची स्थापना करत घरच्या घरी पाण्यात बुडवून विसर्जन विधी पार पाडावा किंवा घरोघरी शाडूच्या माती पासून बनवलेल्या पर्यावरण पूरक मूर्तीची स्थापना करत आपल्या घरीच स्वच्छ पाण्यात विसर्जन करत ते पाणी आपल्या घरासमोरील झाडांना टाकावे किंवा आसपास कृत्रिम तलाव बनवलेला असेल तर तेथे विसर्जन करत आपल्या पवित्र गणेश मूर्तीचे पावित्र्य राखावे तसेच गणपतीचे व आपल्या देवी-देवतांचे निर्माल्य देखील झाडांच्या बुडाशी खत म्हणून पुरावे, तसेच गणपती स्थापना करताना सजावटी साठी पर्यावरण पूरक गोष्टीचा वापर करत सजावट करावी जेणेकरून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास काही अंशी कमी होईल त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येकाने गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्यावर भर द्यावा असे आवाहन ढाकणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गणेश भक्तांना केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे