अंबिका तरुण मंडळा तर्फे श्री गणेश उत्सवानिमित्त अनोखा उपक्रम
कोपरगाव प्रतिनिधी :- दिनांक ०६/०९/२०२२ मंगळवार रोजी अंबिका तरुण मंडळा तर्फे श्री भवानी देवी मंदिर (गावठाण) येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये अहमदनगर पोस्टल विभाग व अंबिका तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ० ते ५ वयोगटातील बालकांचे मोफत आधार नोंदणी करण्यात आली आहे. व नोंदणी अंतर्गत ३९ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली. तसेच आधार कार्ड अद्यावत करणे, आधार नं ला मोबिल क्रमांक लिंक करणे, आधार कार्ड मध्ये दुरुस्ती या मध्ये ५३ नागरिकांची करण्यात आली. भारतीय डाक विभागाने सुरु केलेल्या विमा योजनेच्या टाटा इंशुरन्स कंपनी चे २८ नागरिकांची विमा नोंदणी करण्यात आली आहे. तसेच कोपरगाव नगरपरीषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविले जाणा-या बुस्टर डोस चा लाभ जवळ-जवळ ८० नागरिकांनी घेतला. त्याच प्रमाणे मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासठी २४९ नागरिकांनी लिंक केलेले आहे.या वेळी मंडळाचे अध्यक्ष विनायकराव गायकवाड, शुभम गायकवाड, संकेत अधिकार, गोपी गायकवाड,नंदन वाघमारे, रवी वाघमारे,हर्षल जाधव, वामन गोसावी, ऋषिकेश गोसावी, गोपी खैरे, तन्मय गायकवाड, फरदीन बेग, निलेश वाघमारे, विकी जोशी, पवन कोळपकर, विकी गोसावी, अन्वर शहा, सौरभ गायकवाड, समीर अंभोरे, गौरव कोऱ्हाळकर, आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते



