ब्रेकिंग

माणुसकीच्या मंदिरातील निराधारांच्या मदतीचे कार्य कौतुकास्पद !

वारी येथील मोफत मदत सेवा केंद्रास काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्षा सुहासिंनी कोयटे यांनी भेट दिली असता उपस्थित स्वयंसेवक, ग्रामस्थ व लाभार्थी.

माणुसकीच्या मंदिरातील निराधारांच्या मदतीचे कार्य कौतुकास्पद !

काका कोयटे : वारीतील मोफत मदत सेवा केंद्रास दिली सदिच्छा भेट

कोपरगाव : आजकाल जेष्ठ नागरिकांसह निराधारांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना देखील आहेत. परंतु, या योजनांचा लाभ घेताना लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना मात्र, त्यांची दमछाक होते. त्यामुळे कधीकधी योजनेच्या लाभास पात्र असतानाही वंचित राहावे लागते. वारीत सुरु करण्यात आलेल्या मोफत मदत सेवा केंद्रात अशा घटकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी माणुसकीच्या भावनेतून विनामूल्य फार्म भरून देण्याचे माणुसकीच्या मंदिरातील स्वयसेवकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा एशियन क्रेडीट सोसायटीचे संचालक, खजिनदार काकासाहेब कोयटे यांनी म्हंटले आहे. कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वारी परिसरातील निराधांरासाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्यात आलेल्या “मोफत मदत सेवा केंद्रास” काकासाहेब तथा ओमप्रकाश कोयटे व कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिंनी कोयटे यांनी शुक्रवारी (दि.९) सदिच्छा भेट दिली. यावेळी मदत केंद्राच्या सर्वच मान्यवर स्वयंसेवकानी काका कोयटे व सुहासिनी कोयटे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सन्मान केला.कोयटे म्हणाले, मदत केंद्रामार्फत माणूसकीच्या मंदिरातील चालणाऱ्या कामकाजी माहिती घेऊन समधान वाटले. या उपक्रमासाठी हवी ती मदत करण्यास मी तयार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्व: हस्ताक्षरात या मदत केंद्राविषयी आपला अभिप्राय देखील नोंदविला. यावेळी स्वयंसेवक नरेंद्र ललवाणी, मधुकर टेके, रावसाहेब जगताप, मदन काबरा, भाऊसाहेब टेके, रविद्र टेके, प्रताप टेके, विलास गाडेकर, संजय कवाडे, रावसाहेब वाघ, पंडित वीर, राजेंद्र तिवारी, पंडित चव्हाण, भाऊसाहेब सोळसे, रावसाहेब सोळसे, गोरख टिक्कल, बाळासाहेब भाकरे, शिवाजी राऊत स्वयंसेविका तथा ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा गजभिव, स्मिता काबरा, अनिरुद्ध जाधव, रामकृष्ण टेके यांच्यासह ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे