हद्द वाढ झालेल्या आदिनाथ सोसायटीतील गटार आणि रस्त्याचे प्रश्न त्वरित मार्गी लावा
हद्द वाढ झालेल्या आदिनाथ सोसायटीतील गटार आणि रस्त्याचे प्रश्न त्वरित मार्गी लावा
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी:- गेली अनेक वर्षांपासून हद्द वाढ झालेल्या या भागात ,गटारी ,रस्ते लाईट आदी. कामे मार्गी लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख लढा देत आहे.या प्रयत्नांना यश येत आहे. अनेक कामे मार्गी देखील लागली आहे. नगर पालिकेच्या माध्यमातून आदिनाथ सोसायटी येथील गटार (ड्रनेज) विजेचे खांब, ही कामे बाकी आहे. याचे सर्व ठरावही मंजूर आहे फक्त निधी अभावी कामे रखडली आहे. आहे. तसेच बाकीच्या ही भागातील गटारीचे काम अजूनही बाकी आहे तरी आपणास आम्ही आदिनाथ सोसायटी येथील नागरिक विनती पूर्वक सांगत आहोत की या कामांसाठी आपल्या माध्यमातून आपण निधी मंजूर करून आमची रखडलेली कामे मार्गी लावावी असे निवेदन भुमी पुत्र फाउंडेशन च्या वतिने निसार भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील नागरिक व महिलांच्या वतिने नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी चाकणे यांना आज दि.२०/९/२०२२ रोजी निवेदन देण्यात आले.यावेळी चाकणे साहेब यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख यांनी संवाद साधला असुन ,2 दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन चाकणे साहेब यांनी दिले आहे



