संततधार पावसाने जेऊर कुंभारी परिसरातील पिकांची हानी!!
संततधार पावसाने जेऊर कुंभारी परिसरातील पिकांची हानी!!
कोपरगाव तालुक्यात सातत्याने पडणाऱ्या पावसाने जेऊर कुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, डाऊच बु॥ घारी,पोहेगाव या भागातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.काही दिवसापासून जेऊर कुंभारी परिसरात सतत होणाऱ्या पावसाने पिके उकळली असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे मागिल वर्षी देखील मुसळधार पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता ,शेतकरी खुप मेहनतीने आपले पिके उभी करत असतो पण नैसगिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जात आहे.याही वर्षी पुन्हा पावसानेथैमान घातल्याने मागील वर्षाप्रमाणेच नुकसान होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे सातत्याने पावसाने शेतातील सोयबीन,कापूस मका पालेभाज्या पिकांचे मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने उत्पन्न घट करण्याची शक्यता आहे तेव्हा शासनाने पंचनामे करून मदत करावी अशी अपेक्षा जेऊर कुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, डाऊच डाऊच बुद्रुक, घारी पोहेगाव या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत पावसाने पिकांचे अवस्था पाहता कृषी विभागाकडून पाहणी होऊन पंचनामे व्हावेत अशी मागणी शेतकरी करत आहे.

