“संविधान दिनापूर्वी उद्देश पत्रिका लावावी”* – अँड.नितीन पोळ

“संविधान दिनापूर्वी उद्देश पत्रिका लावावी” – अँड.नितीन पोळ
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या ला संविधानाची उद्देश पत्रिका लावलेली होती मात्र काही कारणांनी ती निघून पडली असून संविधान दिना पूर्वी सदर उद्देश पत्रिका बसवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी नगर पालिका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे केली आहे




आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय असलेली राज्य घटना दिली असून संविधानाच्या पहिल्या पानावर ही उद्देश पत्रिका अर्थात प्रस्तावना लिहिलेली आहे या उद्देश पत्रिकेतून संपूर्ण संविधानाचा गाभा सांगितलेला आहे
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधाना च्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा सन २०१५ पासून देशभर २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो व या दिवशी या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले जाते कोपरगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला ही संविधान उद्देश पत्रिका मार्बल वर लावलेली होती मात्र ती काही कारणाने निघून पडलेली असून नगर पालिकेने जमा केलेली आहे मात्र संविधान दिना पूर्वी सदर उद्देश पत्रिका पुन्हा लावावी अशी अँड.नितीन पोळ, अशोक शिंदे,संजय तूपसैंदर,विजय पवार,मुस्ताक भाई बागवान आदींनी मागणी केली आहे




