यशोगाथा – जन्मेश व जनिशा दामरे यांना ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे परीक्षेत ब्लॅक बेल्ट प्रदान

यशोगाथा – जन्मेश व जनिशा दामरे यांना ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे परीक्षेत ब्लॅक बेल्ट प्रदान
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव : कोपरगाव येथील सेवा निकेतन विद्यालयात ५, ६ व ७ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे कॅम्प व ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये जन्मेश व जनिशा वर्षा प्रविण दामरे या भावंडांनी उल्लेखनीय कामगिरी करत ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जन्मेश वर्षा प्रविण दामरे ह्याची गेल्या दोन वर्षातील उल्लेखनीय कामगिरी:
१. ११व्या ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे स्पर्धेत सात वर्षे वयोगटात कातासाठी गोल्ड व कराटे फाईट (कुमीते) साठी सिल्वर मेडल्स.
२. रेफ्री व जज परीक्षेमध्ये तृतीय स्थान.
३. मे २०२२ मध्ये झालेल्या कराटे कॅम्प मध्ये पाचवे स्थान.
४. ग्रीन बेल्ट व पर्पल बेल्ट परीक्षेमध्ये तृतीय स्थान.
५. ब्लु बेल्ट परीक्षेमध्ये द्वितीय स्थान.जनिशा वर्षा प्रविण दामरे हिची गेल्या दोन वर्षातील उल्लेखनीय कामगिरी:
१. ११व्या ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे स्पर्धेत सहा वर्षे वयोगटात काता व कराटे फाईट (कुमीते) साठी ब्रॉंझ मेडल्स.
२. ग्रीन फर्स्ट बेल्ट परीक्षेमध्ये प्रथम स्थान.
जन्मेश (वय वर्षे ८) व जनिशा (वय वर्षे ६) यांच्या यशाबद्दल ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे राज्यस्तरीय अध्यक्ष श्री. सुदर्शन पांढरे सर , सरचिटणीस सौ. स्नेहल सुदर्शन पांढरे मॅडम , जेष्ठ प्रशिक्षिका कु. वर्षा देठे मॅडम यांनी अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कोरोनाच्या काळात जेव्हा शाळा ऑनलाईन पद्धतीने चालू होत्या तेव्हा काहीतरी शारीरिक व्यायाम हवा ह्या उद्देशाने मार्च २०२१ मध्ये त्यांनी कराटे क्लास चालू केला. कराटे प्रशिक्षक कु. वर्षा देठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध बेल्ट परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तसेच ९ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या ११ व्या राज्यस्तरीय चॅम्पियनशिप मध्येही यश संपादन केले होते.


