श्रीक्षेत्र लासुरगाव (दाक्षायनी देवी) व श्रीक्षेत्र दहेगाव संत जनार्दन स्वामी जन्मभूमी ते श्रीक्षेत्र आळंदी या माऊली पालखीचे “राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधीस्थान कोपरगाव (बेट) येथे स्वागत

कोपरगाव प्रतिनिधी :-श्रीक्षेत्र लासुरगाव (दाक्षायनी देवी) व श्रीक्षेत्र दहेगाव संत जनार्दन स्वामी जन्मभूमी ते श्रीक्षेत्र आळंदी या माऊली पालखीचे “राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधीस्थान कोपरगाव (बेट) येथे स्वागत करण्यात आले.
गेल्या 14 वर्षांपासून ही दिंडी अखंड माऊलीच्या जयघोषात सुरू आहे. याप्रसंगी श्रीची आरती करून त्यानंतर पालखी समोर दांडिया व पारंपारिक नृत्य सादर करण्यात आले. पालखीतील भक्तांना पुडी-भाजी व चहा असा अल्पोपहार गोदाकाठ श्री योगी विरबा सेवा ट्रस्ट, डाऊच – खुर्दच्या वतीने देण्यात आला. प्रसंगी दिंडी प्रमुख तसेच विणेकरी दत्तु महाराज पळशीकर यांचा संस्थेचे अध्यक्ष गणेश बढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बढे, गायत्री बढे, सतीश वैद्य, सिद्धार्थ साप्ते, साईनाथ पवार, वाल्मिक पवार, चंद्रकांत पारखे, प्रदीप ठोंबरे यांचेसह वारकरी भक्त मंडळी उपस्थित होते.