महाराष्ट्र

पुणतांबा येथे हिंदुह्रदयसम्राट वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांची दहावी पुण्यतिथि स्मृतीदिन साजरा

 

पुणतांबा येथे हिंदुह्रदयसम्राट वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांची दहावी पुण्यतिथि स्मृतीदिन साजरा

संपादक:- रविंद्र जगताप

हिंदुह्रदयसम्राट वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांची दहावी पुण्यतिथि स्मृतीदिना निमित्ताने आदरांजली कार्यक्रम पुणतांबा शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली , विठ्ठल मंदिरात साजरा करण्यात आला , याप्रसंगी खडगधारी खंडोबा मंदीराचे पुजारी, श्री प्रभाकर (बाबा ) शेंडगे व जेष्ठ शिवसैनिक शंकरराव शेलार, यांचे शुभ हस्ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे विधीवत पूजन करून आदरांजली कार्यक्रमाचा शुभारंभ केला, यावेळी शेडंगे बाबा यांनी ठाकरे यांचे कार्य भाषा शैली एकवचनी असल्याने त्यांनी जगावर , देशावर , सर्व समाजातील नवयुवक तरूण वर्ग यांचे ह्रदयावर राज्य केले , त्यांना जनतेने हिंदुह्रदयसम्राट पदवी बहाल केली, त्यांनी महाराष्ट्र राज्यात मराठी माणूस स्वाभीमानाने घडवुन , राष्ट्रभक्तीने भक्कम पणे उभे करण्याचे कार्य केले, जेष्ठ शिवसैनिक शेलार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ,बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर काम करायला मिळाले, त्यांना जवळुन बघण्याचे अनुभवायाचे योग आले हेच माझे भाग्य समजतो ,साहेबांनी समाजातील वंचित गोरगरीब गरजू घटकांची सेवा करत असताना, महाराष्ट्र राज्यात एक क्रांती घडवण्याच काम केले, सर्व सामान्य कुटूंबातील तरूण होत करू कार्यकर्ते यांचे संघटन करून, त्यांना शिवसेना या संघटनेच्या माध्यमातून आमदार खासदार मंत्री केले ,आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन, नगरजिल्ह्यात प्रथम 16/2/82 ला पुणतांबा गावात सुहास वहाडणे यांचे सह आम्ही दहा वीस तरूण कार्यकर्ते नी शिवसेना स्थापन केली ,त्यावेळी नाशिक शिवसेना बबनराव घोलप साहेब ,कै केशवराव थोरात यांच्या हस्ते पुणतांबा गावात शिवसेना स्थापन केली, आजचे विद्यामान शहरप्रमुख महेश कुलकर्णी हे बालशिवसैनिक म्हणुन शिवसेनेत छोटे मोठे काम कार्य करून शिवसेनेच्या कार्यक्रमास मुबंई दसरा मेळावा सह इतर कार्यास त्यांनी स्वताला झोकून दिले, आज एक कडवट निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्याची आज ओळख निर्माण झाली आहे, आमचे तालमीत आम्ही एक कडवट शिवसैनिक घडवल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे, त्याचे वडील आमचे मित्र कै दिगंबर कुलकर्णी यांचा त्याकाळी शिवसैनिकांना मदतीचा हात असत , आज ही महेशचे योगदान नविन शिवसैनिका साठी उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे असे सांगितले, शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी जुन्या काही आठवणी जागृत करून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जवळुन बघण्याचे् योग आले , मला साहेबांनी शिवसेना भवन येथील भेटीत त्यांचे मांडीवर बसवुन छातीजवळ कवटाळुन पाठीवर शाबासकीची थाप दिली ती थाप माझे आयुष्यातील सर्वोच्च योग आशिर्वाद आहे,वंदनीय बाळासाहेबांचे आशिर्वाद व त्यांचे त्यावेळे चे काही शब्द आज ही मला प्रेरणादायी आहे, मला जेष्ठ शिवसैनिकांचे प्रेम सहकार्य मिळाले त्यांचे आशिर्वादाने मी आज शहरप्रमुख पदावर कार्यरत आहे त्यांचे योगदान खुप मोठे आहे, हे आजचे युवकांना माहिती नाही,हि सर्व किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आहे , शिवसेनेत माणसाची जात बघीतली जात नाही, मानुसकी हीच जात , जातीचे राजकारण शिवसेना कधीच करत नाही, शिवसेना पक्ष हा सर्व सामान्य मानसाचा पक्ष आहे ,इथे समाजातील वंचित गोरगरीब गरजू घटकांची सेवा करण्यासाठी साहेबांचे विचाराने बाळकडु दिलेले आहे, 20%राजकारण, 80% समाजकारण या शिकवणीतुनच होतकरू कार्यकर्ते नेते,लोकप्रतिनिधी, आमदार , खासदार ,मंत्री , नगरसेवक, व इतर पदाधिकारी म्हणून घडत असतात व प्रामाणिक कार्य करणार्याला न्याय मिळतोच असे सांगितले याप्रसंगी युवासेनेचे शहरप्रमुख किशोर गांगुडॅ उपशहरप्रमुख वैभव जेजुरकर, शिवसेना संघटक दिनेश बागुल जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ लावर , बालशिवसैनिक चि उत्कर्ष कुलकर्णी, युवतीसेनेच्या कु नेहा कुलकर्णी, सौ चित्रा कुलकर्णी, सौ राणी लावर, सौ पुजा वहाडणे, सौ वृशाली कुलकर्णी, धन्वंतरी पतसंस्थेचे कॅशियर व धडाडीचे सामाजिक युवा कार्यकर्ते रविभाऊ सोनटक्के, सामाजिक युवा कार्यकर्ते प्रीतम धोत्रे, रामभाऊ सांबारे, अवधुत जोशी सह सर्व मान्यवरांनी वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहिली,

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे