गुन्हेगारीसामाजिक

मी छत्रपती शिवरायांचा मावळा,, त्या प्रकरणातील आरोपींना अटक करा अन्यथा उपोषण: भरत मोरे

मी छत्रपती शिवरायांचा मावळा,, त्या प्रकरणातील आरोपींना अटक करा अन्यथा उपोषण: भरत मोरे

प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे काही दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकाने मस्जिद मध्ये घुसून पवित्र ग्रंथ कुराण शरीफची विटंबना केली असून घटनेला १० दिवस उलटूनही आरोपी अटक न झाल्याने विवीध ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोपरगाव शहरातील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी देखिल या प्रकरणी आरोपी अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला असून याचे पत्र शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले.यावेळी बोलताना भरत मोरे म्हणाले की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि मी छत्रपती शिवरायांचा मावळा असल्याने मी त्यांच्या मार्गावर चालणार असून ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती आणि बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. महाराजांनी कधीही इतर धर्मियांचा व धर्मग्रंथांचा अनादर केला नाही. जातीय वाद केला नाही. कोपरगावात कोळगाव थडी येथे जी पवित्र धर्मग्रंथाची विटंबना झाली मी त्या घटनेचा निषेध करतो, कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ हा पवित्र असतो आणि अशा प्रकारे काही समाजकंटक गैरकृत्य करत असतील आणि जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करत असतील तर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन अटक करावी अन्यथा 25 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ माझा व्यवसाय बंद ठेवून एक दिवसीय निरंकार उपोषण करणार असल्याचे भरत मोरे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे