महाराष्ट्र

बोरसर येथील महसूल शिबिरात 820 प्रमाणपत्रांचे वाटप

बोरसर येथील महसूल शिबिरात 820 प्रमाणपत्रांचे वाटप

वैजापूर प्रतिनिधी विजय त्रिभुवन

दि 6 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत बोरसर तालुका वैजापूर येथे दिनांक 6 रोजी आयोजित शिबिरात 820 विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले .विष्णू मंदिर सभागृहात झालेल्या या शिबिरास अध्यक्षस्थानी आमदार प्रा.रमेश पा. बोरणारे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती सौ वंदना शिंदे तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री.मनोज पा. गायके ,पंचायत समिती सदस्य सुनंदा पवार या उपस्थित होत्या .या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून त्यापैकी बहुतेक समस्यांचे निराकरण तात्काळ करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक तहसीलदार श्री.सुनील सावंत यांनी केले .याप्रसंगी नायब तहसीलदार श्री.महाजन मंडळ अधिकारी दुर्गाप्रसाद फालक, ग्राम महसूल अधिकारी व विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतेश्वर मेहंगे यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे