धार्मिक

17 डिसेंबर (शनिवारी) नाशिकच्या धम्ममेळाव्यामध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावे:- शरद खरात

17 डिसेंबर (शनिवारी) नाशिकच्या धम्ममेळाव्यामध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावे:- शरद खरात

17 डिसेंबर (शनिवारी) नाशिक येथे धम्ममेळाव्याचे आयोजन करण्या आले आहे सदरचा धम्ममेळावा समस्त बौद्धांची एकमेव शिखर मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या अंतर्गत असून नाशिक जिल्हाच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या धम्ममेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय श्रद्धेय ऍड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर (राष्ट्रीय सल्लागार भारतीय बौध्द महासभा ) व आदरणीय डॉ. भिमराव यशवंत
आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौध्द महासभा) आदी.उपस्थित राहून बौध्द जनतेला मार्गदर्शन करणार आहे.हा विभागीय धम्ममेळावा असल्याने नाशिक,नगर, धुळे, जळगांव, नंदुरबार तसेच अन्य जिल्ह्यातील बौध्द जनता मोठ्या संख्येने धम्ममेळाव्याला उपस्थित राहणार आहे. यामुळे आपल्या बौध्द जनतेची सर्वत्र एक ताकद दिसून येईल.नाशिक जिल्हाकडे या धम्ममेळाव्याचे आयोजनपद असल्याने हा धम्ममेळाव्यास तन मन धन व क्षण देवून यशस्वी करण्यासाठी नाशिक महानगरामध्ये व जिल्ह्यामध्ये वास्तव करणाऱ्या प्रत्येक बौध्द परिवाराची नैतिक जबाबदारी आहे.या धम्ममेळाव्यामुळे नाशिकच्या धम्मचळवळीला गतिमान करता येईल.या धम्ममेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून पुजनीय भिक्खू संघ, धम्मअभ्यासक, बौध्द साहित्यिक,विचारवंत,कलावंत,शाहिर, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी, विविध बौध्द मान्यवर उपस्थित राहून भेट देणार आहे. ज्यामुळे आपणास त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळेल. या विभागीय धम्ममेळाव्याच्या निमित्ताने बौध्द जनतेच्या सोबतच बहुजनवर्गा, सामान्य जनता,वंचित समुह, कष्टकरी,मजूर,महिला,युवा, विद्यार्थी, शेतकरी,शासकीय नोकरदार, व्यवसायिक जनतेच्या महागाई, रोजगार,बेरोजगारी आदी.यांच्याशी संबंधीत अतिशय महत्वपूर्ण प्रश्नावर एका मोठ्या मंचावरुन विस्तृतपणे मांडले जाणार आहे.समस्त बौध्द समाजाच्या सर्वांगीण धार्मिक, सामाजिक व राजकीय विकासाच्या व भविष्याच्या दृष्टिने ठोस भूमिका घेतली जाणार आहे.
त्यामुळे आपणास विंनंती करण्यात येते की, या धम्ममेळाव्यास शहरातील प्रत्येक बुध्द विहार कमिटी, महिला मंडळ, अनेक विविध धार्मिक ,सामाजिक संस्था पदाधिकारी यांनी स्वतःच्या परिवाराचे आर्थिकदान योगदान देवून मोठ्या संख्येने अवश्य सहभागी झालेच पाहिजे.या मेळाव्यासाठी बोध्द उपासक उपासिका यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र संघटक शरद खरात यांनी केले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे