धार्मिक
दु:ख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी भगवान बुध्दांच्या विचारांची गरज,बुध्दांचे विचार जाणून घेण्यासाठी बोध्द स्थंळाना भेटी देण्याची गरज
कोपरगाव येथील बोध्द उपासक उपासिका यांची बोध्दगया धम्म यात्रेला सुरुवात
दु:ख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी भगवान बुध्दांच्या विचारांची गरज,बुध्दांचे विचार जाणून घेण्यासाठी बोध्द स्थंळाना भेटी देण्याची गरज
कोपरगाव येथील बोध्द उपासक उपासिका यांची बोध्दगया धम्म यात्रेला सुरुवात
संपादक:-रविंद्र जगताप
कोपरगाव :- जगाला युद्धाची नव्हे, बुध्दांची गरज आहे.मानवाच्या जीवनात दुःख का येते,दुःखाचे कारण काय,असे विविध प्रश्नाचे उत्तर बोध्द धम्मात आहे.बोध्द धर्म नसून तो धम्म आहे.धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला होय.बुध्दांचा धम्म हा विज्ञानावर. आधारित आहे.मानवाच्या जीवनातील सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी धम्माचा अभ्यास करणे गरजेचे आहे,धम्माचा उत्तम अभ्यास धम्म यात्रेतुन होतो.भगवान बुध्दांच्या पवित्र स्थंळाना भेट दिल्यास मन प्रसन्न होते.वर्षातून एकदा तरी प्रत्येक बोध्द बांधवानी धम्म यात्रा करावी.कोपरगाव तालुक्यातील बोध्द उपासक उपासिका यांची नुकतीच दि.१५ डिसेंबर २०२२ रोजी बोध्द यात्रेला सुरुवात झाली आहे.यशोधरा पराग धम्मयात्रा यांच्या वतिने परमपुज्य भिक्खु धम्मशरण यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीधर अहिरे,भागवत भाटे,नानाभाऊ रोकडे, गिरिष यांच्या सहकार्याने हि धम्म यात्रा मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे

.१५ डिसेंबरला हि यात्रा कोपरगाव येथुन सुरु झाली असुन सारनाथ, धम्मेकसुप,मृगदायन,गंधकुटी विहार, अशोक स्तंभ बोध्दगया, महाबोधीविहार,मुचलिंग तलाव,विधी वृक्ष, निरजंन नदी,उरुवेला सुजाता महल,डुगेश्वरी पर्वत,राजगिरी पर्वत,गंधकृटी पर्वत,वेळु वन,राजाबिबिसार जेल,सोन भंडार,तालकटोरा,वैशाली विश्वशांती स्तूप,विश्वशांती स्तुप, रामाभार स्तूप, कोलवा गाव, अशोकस्तंभ,कुशिनगर दर्शन भगवान बुध्दांचे महापरिनिर्वाण स्तुप, रामाभार स्तुप, माथाठेक, इतर देशांचे विहारे,लुंबीनी (नेपाळ) भगवान बुध्दांचे जन्मस्थान, महामाये माहेरघर, शुध्दोधन राजाची राजधानी सिध्दार्थ गौतमाचे तीन महाल, भगवान बुध्दांचे उपदेश स्थळ कपीलवस्तू,श्रावस्ती दर्शन जेतवन, अंगुलीमाल गुफा, श्रीलंका युथ टॅम्पल, थाई विपश्यना केंद्र, बुध्दांची विशाल मुर्ती आदि ठिकाणी हि धम्म यात्रा होणार आहे.दि १५ डिसेंबर २०२२ ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत हि यात्रा संपन्न होत आहे.या धम्म यात्रेसाठी कोपरगाव येथील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहे.




