धार्मिक

मायगांवदेवीत स्वामी मुकूंदानंद सरस्वती महाराजांचा तेवीसावा पुण्यतिथी महोत्सव 

मायगांवदेवीत स्वामी मुकूंदानंद सरस्वती महाराजांचा तेवीसावा पुण्यतिथी महोत्सव 

संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगांव :- तालुक्यातील मायगांव देवी येथील ब्रम्हलिन १००८ परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी मुकूदानंद सरस्वती महाराजांचा तेवीसावा पुण्यतिथी सोहळा २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होत असुन यानिमीत्त दररोज सायंकाळी ७ ते ९ यावेळेत किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री व ऋषीकेशचे हभप दिनानाथ महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने ३० डिसेंबर रोजी या सोहळयाची सकाळी ११ वाजता सांगता होईल..              हभप ऋषीकेश महाराज चव्हाण (२७ डिसेंबर), हभप संजय महाराज हिंगे (२८ डिसेंबर), हभप जालींदर महाराज शिंदे (२९ डिसेंबर) यांचे किर्तने होतील तर ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत स्वामी मुकूदानंद सरस्वती महाराजांच्या पादुका पुजन होईल.या किर्तन महोत्सव कार्यक्रमांत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख प. पू. रमेशगिरी महाराज, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे, प. पू. कामेश्वगिरी महाराज, उत्तरप्रदेशचे प. पू. आत्माराम महाराज, प. पू. गोविंदपुरी, हभप राघवेश्वरानंदगिरी महाराज, विकास महाराज हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व भाविकांनी या पुण्यतिथी सोहळ्यास व किर्तन श्रवणास मोठया संख्येने सहभाग घेवुन सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मायगांवदेवी गुरूदेव आश्रम पंचक्रोशीतील धामोरी, सांगवीभूसार, वेळापूर, मंजुर, कारवाडी, मोर्विस, मढी, चासनळी, सत्यगांव आदिंनी केले आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिराती
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे