बशीरभाई भुरे यांची सलग तिसऱ्यांदा मानव सुरक्षा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

बशीरभाई भुरे यांची सलग तिसऱ्यांदा मानव सुरक्षा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
शौकतभाई शेख
श्रीरामपूर- सामाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षितांसोबतच जनमानसाच्या विविध नागरी समस्यांसोबतच त्यांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने शासन दरबारी दगडून त्यांना त्यांचे हक्क प्राप्त करुन देण्यासाठी राज्यभर कार्यरत असलेल्या मानव सुरक्षा सेवा संघ या सेवाभावी संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी बशीरभाई भुरे यांची सलग तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आल्याने संघाचे राज्यभरातील पदाधिकारी आणि सदस्यांगणात मोठे नैवचैतन्य निर्माण झाले असून सेवा संघाच्या सदस्य पदाधिकाऱ्यांसमवेत विविध सामाजिक संस्था संघटनांकडून यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. बशीरभाई भुरे कार्य म्हणजे वीस टक्के राजकारणतर ऐंशी टक्के समाजकारण असे आहे,
याकरीता राष्ट्रीय अध्यक्ष श्री.राखपसरे यांनी त्यांच्यावर तिसऱ्यांदा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा भार सोपविला आहे,श्री.भुरे हे सामाजिक उपेक्षित आणि दुर्लक्षितांसोबतच जनसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असतात,नेहमीच गोरगरीबांना मदतीचा हात पुढे करत सातत्याने सहकार्य करीत असतात, क्षणाचा विलंब न करता त्यांच्या हाकेला धावून जातात, पिडीत,अन्यथाग्रस्तांचे प अश्रू पुसतात,मागे कोरोना संकटकाळात कडक लॉकडाऊन असताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात हिंदू – मुस्लिम अशा समस्त सामाज बांधवांच्या घरोघरी जाऊन रेशनिंग किटचे वाटप करत मदतीचा मोठा आधार दिला, यासोबतच अनेक कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केले, तथा अनेकांना आवश्यक असलेली सामग्री उपलब्ध करून दिली,अशा प्रकारची त्यांची निर्पेक्ष कामगिरी पाहून कॉंग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या आदेशान्वये त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानितही करण्यात आले आहे. श्री.बशीरभाई भुरे यांनी सन २०२१- २०२२ मध्ये, मानव सुरक्षा सेवा संघा च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी असताना मानव सुरक्षा सेवा संघा च्या माध्यमातून व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राखपसरे यांच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करून जनतेसाठी केलेली उल्लेखनीय कामे पुढील प्रमाणे – नाशिक जिल्ह्यातील येवला येथे लॉकडावून मध्ये शेतकरी, मजूर, कर्मचारी, व काही नागरीकांचे वीज बिल थकयाने शेकडो नागरीकांची वीज कपात करण्यात आली होती,अशावेळी मानव सुरक्षा सेवा संघाचे येवला येथील सचिव श्री.टके यांचा फोन श्री.भुरे यांना आला,त्यावर तात्काळ श्री.भुरे यांनी त्वरित नाशिक येथील वीज अभियंता यांना फोन करून वीजपुरवठा सुरू करण्यास सांगितले व तात्काळ वीज पुरवठा सुरू झाला, तसेच अनेक शेतमजूरांचे वीज बील शासन दरबारी पाठपुरावा करुन माफ करुन घेण्यात मोठा पुढाकार घेतला. तर काहींना वीज बिल भरण्यासाठी सवलती मिळवून दिल्या,सांगली येथील अबूलकलाम आजादनगरमध्ये नागरिक पाणी, वीज, रस्ते, शौचालय अशा नागरी सुविधांपासून वंचित होते,श्री.भुरे यांनी स्वत: सांगली येथे ८ दिवस मुक्काम ठोकून सांगली कुपवाड म.न.पा. आयुक्तांना लेखी पत्र देवून सतत पाठपुरावा करून अबूलकलाम आजादनगर मधील नागरी समस्यांप्रश्नी जनतेला न्याय मिळवून दिला, तसेच कवठे महांकाळ येथील जनतेच्या समस्या ऐकून त्या कटाक्षाने दूर करण्यासाठी प्रयत्न केले, पुणे येथे भेट देवून पोलीस अधिकारी यांना भेटून जनतेचे काही वादविवाद मिटविले, मालेगांव येथे काही ठिकाणी गटारे तुंबली असल्याबाबत तेथील महिला तालुका अध्यक्षा (मा.सु.से.सं.) यांचा फोन येताच स्वत: श्री.भुरे यांनी तात्काळ मालेगावी जावून म.न.पा.आयुक्तांना भेटून सदरील गटारे साफ करून घेतली, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मौजे मुखेड येथील दुलाजी नाना पाटील, अनाथ आश्रमामध्ये संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राखपसरे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ संघाचे पिंपळगाव बसवंत शहराध्यक्ष, फईम शेख, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा नफीसा खाटीक आणि सहकार्यांना सोबत घेवून संबंधित अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना वह्या,पेन आदि शैक्षणिक साहित्य वाटप केले,शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणी त्याद्वारे उपेक्षित, दुर्लक्षित आणि जन सामान्यांच्या फायदा व्हावा यासाठी पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेऊन तथा विविध ठिकाणी प्रबोधनात्मक मेळाव्यांचे आयोजन करुन पिंपळगाव बसवंत परिसरासह राज्यभरातील अनेक विधवा,परित्यक्ता, घटस्पोटित, वयोवृद्ध,दिव्यांग, अशा शेकडो नागरीकांना,संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना, अशा शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला व देत आहेत, मानव सुरक्षा सेवा संघाच्या वर्धापनदिन निमित्ताने पिंपळगाव बसवंत येथील सहकार्यांना घेवून शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रूग्णालयात रूग्णांना फळे, मिठाई वाटप केले, सांगली येथील पोलिस अधिकारी यांना भेटून काही कुटूबांचे वाद मिटविले, कोरोना काळात पोलिसांनी जिवाची तमा न बाळगता जनतेला सहकार्य केले, अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राखपसरे यांच्या आदेशान्वये कोरोना योद्धा म्हणून रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पो.स्टे. म्हसळा पो.स्ट., श्रीवर्धन पो. स्टे. तथा अन्य ठिकाणी शाळ, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व मानव सुरक्षा सेवा संघा चे सन्मानपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.अनेक कुटूबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून मानव सुरक्षा सेवा संघा चे सभासद वाढविले, असे अनेक समाजकारण चे कामे केली, याचीच पोहचपावती म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राखपसरे आणि कॉअर कमेटीने सन २०२३ या वर्षाकरीता पुन्हा तिसऱ्यांदा श्री.भुरे यांची मानव सुरक्षा सेवा संघा च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड केली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,समता फाऊंडेशनचे ॲड. मोहसिन शेख आदिंनी अभिनंदन केले आहे.




