भंडाऱ्याच्या उधळणीत घारी येथील बिरोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न



भंडाऱ्याच्या उधळणीत घारी येथील बिरोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव तालुक्यातील घारी (बढे वस्ती) येथील बिरोबा देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान म्हणून परिसरात ओळखले जाते. काल दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी बिरोबा देवाची यात्रा विधिवत मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थित भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक, पूजा महाआरती करत मोठ्या उत्साहात पार पडली.प्रारंभी देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष किशोर बढे (बाबा) यांचे शुभहस्ते मूर्तीला विधिवत अभिषेक करून गंगास्नान व धार्मिक विधी संपन्न होत देवाच्या भेटीला आलेल्या पंचक्रोशीतील श्रीक्षेत्र शिर्डी बिरोबा बन, संवत्सर, राहता, डाऊच खुर्द, सावळीविहीर आदी ठिकाणच्या देवाच्या काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावाला वळसा घालत सर्व देवदेवतांचे दर्शन घेत देवाच्या काठीची मिरवणूक मंदिर परिसरात आल्यावर श्री बिरोबा देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन ओव्या, ढोलवादन, हेडाम (वीरनृत्य) सादर करण्यात करून महाआरती करण्यात आली.


देवस्थानच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादानंतर देवाची गादीचा होईकाचा कार्यक्रम पार पडला यात भाकनुक करण्यात आली, भाकनुक म्हणजे भविष्यात होणाऱ्या घटना यात सांगितल्या गेल्या. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी देवस्थानचे सर्वेसर्वा तथा संस्थापक किशोर बढे (बाबा), लहानु जाधव, गणेश बढे, चांगदेव बनकर, सोपानबाबा बनकर, गणेश काटकर, किसन गावडे, निवृत्ती बनकर, नानासाहेब काटकर, अनिल बढे, जनार्दन आंबिलवादे, अशोक गायकवाड, सचिन चौधरी, पंढरीनाथ बढे, हरिभाऊ कांदळकर, विलास मेचे, गणेश गिधाड, धोंडीराम बढे, नाना कोळगे, चंद्रकात पारखे, अंबादास वायकर, गौरव जाधव, सौरभ बढे, निलेश बढे, मच्छिंद्र कांदळकर आदिनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.




