महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रासाठीची मानक कार्यप्रणाली स्वागताहार्य डॉ. अशोक गावित्रे
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रासाठीची मानक कार्यप्रणाली स्वागताहार्य डॉ. अशोक गावित्रे
हेमंत शेजवळ शिर्डी प्रतिनिधि
मानक कार्यप्रणाली मध किमान वेतन, वेतन प्रदान,घरभाडे भता, बोनस प्रदान, भविष्य निर्वाह, कर्मचारी विमा, बालक आणि किशोरवयीन कामगार अधीनियम यांचा समावेश करण्यात आला आहे *चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील कामगार तसेच मालक, निर्माते यांनी उपस्थीत केलेले मुद्दे तसेच विविध कामगार अधिनियमा अंतर्गत तरतूदी विचारात घेऊन चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील मालक /निर्माते यांची जबाबदारी आणि कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळ्वण्याकरिता मानक कार्यप्रणाली लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, सदर कार्यप्रणाली नुकतीच जाहीर झाली असून सदर कार्यप्रणालीची अंमलबजावणी करणे सिने सृष्टितीतील सर्व मालक /निर्माते तसेच कामगार ,सहकलाकार, तंत्रज्ञ तसेच कामाच्या स्वरूपानुसार काम करणाऱ्या सर्व संबंधितांवर बंधनकारकर असेल , सदरची मानक कार्यप्रणाली ही राज्यातील चित्रपट, दूरदर्शन मालिका,जाहिरात विभाग, यु ट्यूब, वेब सिरीज व इतर असंघटित करमणूक क्षेत्रातील विभागामधे काम करणारे व्यावसायिक चित्रपट निर्मिती करणारे निर्माते, सिनेमा दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, ऍक्शन अँड स्टंट दिग्दर्शक तसेच सर्व प्रकारचं अभिनय करणारे कलाकार, सह कलाकार, नायक, नाईका, सहनायक,सहानायिका, गायक, व्हॉइस एडिटर, लेखक, बाल कलाकार,तंत्रण्य (ध्वनिमुद्रण करणे, एडिटिंग करणे, साऊंड रेकॉर्डिंग, हेड कॅमेरामन इ ) कामगार (रंगमंच उभारणारे कामगार हेड टपीस्ट, असिस्टंट टपिस्ट, हेड पैंटर, पेंटर, कारपैंटर, पॉलिशमॅन, पीसमोल्डर, मोल्डर, कास्टर,लाइटमन, स्पॉटबॉय, प्रोडक्शन बॉय, क्रेन ऑपरेटर, ईलेक्ट्रीशन, जनरेटर ऑपरेटर, हेल्पर, फोटोग्राफर, साऊंड इंजिनियर, स्टंट आर्टिस्ट, सहाय्यक कोरस /गायक, गायिका, महिला पुरुष सहकलाकार, सीने कॉस्टुम व मेकअप आर्टिस्ट, ऍक्शन डबिंग इफेक्ट आर्टिस्ट, डान्सर्स, जुनियर आर्टिस्ट, स्टील फोटोग्राफर, ड्रेसमन, बॅकस्टेज आर्टिस्ट, त्रूतीयपंती भूमिका करणारे कलावंत, बालकलाकार व इतर तत्सम स्वरूपाचे काम करणारे कामगार /कर्मचारी /तंत्रज्ञ तसेच असंघटित क्षेत्रातील शासनाने घोषित केलेले 300 प्रकारचे उद्योग /व्यवसायाचे यादीतील क्र 65 ते क्र 77नुसार करमणूक व संबंधित काम करणारे कामगार जसे की दृकश्राव्य कामाशी संबंधित कामगार, वाजंत्री, कॅमेरामॅन सिनेमाशी संबंधित कामे, सिनेमा प्रक्षेपण संबंधित कामे, सर्कस कलाकार, नर्तक, घोडेस्वार, जादूगार, मॉडेल, कवी /लेखक इत्यादीना लागू राहील, त्याचबरोबर दूरदर्शन मालिका निर्मिती, लघुपट निर्मिती, वेब सिरीज निर्मिती, जाहिरातट निर्मिती, ऑडिओ व्हिजुअल अल्बम निर्मितीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील ही मानक कार्यप्रणाली लागू राहील, यामुळे सर्वांचं हित साधलं जाऊन कलाकारांची तसेच तंत्रांज्ञ व निर्माते याच देखील हित साधलं जाईल या निर्णयाबद्दल मा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, मुखमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसेच संस्कृतीक मंत्री सुधीरजी मनगुटीवर तसेच कामगार मंत्री सुरेश खाडे यांच धन्यवाद


