शिर्डी पंढरपुर रेल्वे चालु करावी
संपादकीय
शिर्डी पंढरपुर रेल्वे चालु करावी
काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्रांना जोडण्याकरिता मुंबई ते शिर्डी व मुंबई ते सोलापूर अशा दोन वंदे भारत या नावाने रेल्वे सेवेचा भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब व अनेक मोठ्या मान्यवरांचे उपस्थिती मध्ये मोठ्या थाटामाटात झाला . ही बाब आपल्या कोपरगाव व शिर्डी परिसरातील साई भक्ता करिता आनंदाची, व कौतुकास्पद आहे यामुळे शिर्डी तुळजापूर व अक्कलकोट या सारख्या मोठ्या तिर्थ स्थानाला जाण्याची चांगली सोय झाली आहे . याच पध्दतीने आपल्या महाराष्ट्राचे गोरगरीबांचे वारकरी भक्तांचे लाडके दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री पांडूरंग ( विठ्ठल ) येथे आपल्या कोपरगांव व शिर्डी परिसरातून अनेक भाविक भक्त जात असतात त्या करिता सुध्दा एखादी नव्याने कोपरगाव येथून किंवा शिर्डी येथून पंढरपूर येथे जाणे करिता साधी पॕसींजर रेल्वे सेवा चालू व्हावी अशी अनेक दिवसा पासून मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्तांची मागणी होत आहे . गेले पाच सहा वर्षा पासून साईनगर एक्सप्रेस शिर्डी ते पंढरपूर ही रेल्वे काही तांत्रिक कारण सांगून तात्पूरती बंद करण्यात आली ती अद्याप बंदच आहे त्या मूळे फार मोठी गैरसोय झाले ली आहे तरी किमान ही तरी रेल्वे सेवा पुर्ववत सुरु करावी अशी जनता भाविक भक्त मागणी करत आहे.काही दिवसात शाळेला सुट्या लागतील उन्हाळ्यात शाळेला सुट्या असल्याने अनेक भाविक देवदर्शनासाठी फिरत असतात.शिर्डी पंढरपूर अथवा मनमाड पंढरपूर अशी रेल्वे चालु करावी जेणे करुन भाविकांना त्याचा फायदा होईल.गरिबासांसाठी रेल्वे प्रवास परवडणारा असतो.सामान्य नागरिक प्रथम रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात.त्याच बरोबर लांबच्या पल्याच्या प्रवासाला रेल्वेचा प्रवास सुखकर असतो.शिर्डी पंढरपूर रेल्वे जोडल्यास दोन देवस्थान जोडले जातील
लेखन:-संपादक:- रविंद्र जगताप




