गुन्हेगारी

पो.नि.वासुदेव देसले यांच्या आश्वासनावरून आज सुरू झालेले टिळक नगर येथील अल्पवयीन बेपत्ता मुलीच्या आई वडील व स्थानिक रहिवाशांचे उपोषण 9 मार्चपर्यंत स्थगित

पो.नि.वासुदेव देसले यांच्या आश्वासनावरून आज सुरू झालेले टिळक नगर येथील अल्पवयीन बेपत्ता मुलीच्या आई वडील व स्थानिक रहिवाशांचे उपोषण 9 मार्चपर्यंत स्थगित

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव शहरातील टिळकनगर मधील अल्पवयीन मुलगी मागील ७ दिवसांनपासून बेपत्ता असल्याने यावर कोपरगाव शहर पोलिसांनी काय कारवाई केली यासंदर्भात आज शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पीडित मुलीचे पालक व नातेवाईक हे आज दिनांक ३ मार्च २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोर उपोषणासाठी बसले असता कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आम्ही पीडित अल्पवयीन मुलीचा तपास आमचा सुरू असून ते अनेक वेळा लोकेशन बदलत असल्यामुळे त्यासाठी थोडा वेळ लागत आहे तेव्हा आपण आम्हाला अजून दोन दिवसाचा मुदत द्यावी म्हणजे साधारण ९ तारखे पर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्या मुलीचा शोध लावून सदर मुलगी आम्ही तुमच्या ताब्यात देऊ असे आश्वासन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपोषण स्थळी बसलेल्या टिळकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग तसेच टिळकनगर भागातील रहिवासी व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती केली की आपण अजून दोन-तीन दिवस आम्हाला सहकार्य करावे त्यांच्या आश्वासनावरून अखेर आज ३ तारखेचे सुरू झालेले उपोषण ९ मार्च पर्यंत स्थगित करीत असल्याचे प्रकाश दुशिंग यांनी यावेळी उपस्थित समाज बांधवांना सांगितले तर टिळकनगर मधील महिलांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना विचारणा केली की जर सदर मुलीचा ९ तारखेपर्यंत शोध लागला नाही तर आम्ही कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुका बंद करण्याची हाक देत आहोत तशी वेळ आमच्यावर येऊ नये यासाठी आपण आपली तपासाची चक्रे फिरवून सदर अल्पवयीन मुलीला आमच्या ताब्यात द्यावी असे यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे