मातंग समाज क्रांती मोर्चा च्या वतीने उपोषणाचा इशारा
मातंग समाज क्रांती मोर्चा च्या वतीने उपोषणाचा इशारा
मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना २३ सप्टेबर २०२४ रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की गेली १२ वर्षेपासून कोपरगाव येथिल साहित्यरत्न डॉ. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा तयार होवुन येत नव्हता, आणि आता कोपरगाव शहरात पुतळा येवुन ३ वर्षे होत आली आहेत तरी देखील कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने पुतळ्याचा लोकार्पण अनावरण सोहळा अद्याप पावेतो केलेला नाही. हा लोकार्पण सोहळा न होण्यापाठीमागील कोपरगाव नगरपरिषदेचे कोणते कारण आहे हे अद्याप समाज बांधवांना समजले नाही. प्रत्येक वेळेस समाज बांधव व कोपरगावातील विविध सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपाये निवेदन दिले असता त्यांना विविध प्रकारची कारणे सांगण्यात आली आहे.तसेच कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले कलाप्रेमी व रसिक प्रेक्षकांसाठी खुले नाट्यगृह याला कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृह असे नामकरण दिले आहे. परंतु नामकरण केल्यापासुन व त्या आधी जवळपास ११ वर्षापासून खुले नाट्यगृहाचे कोणत्याही प्रकारचे डागडुजी व सुशोभिकरण करण्यात आलेले नाही.सदरच्या नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नामकरण देवुन खुले नाट्यगृहाला भन्न अवस्थेत ठेवुन कोपरगाव नगरपालिकेने जगप्रसिद्ध साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या नावाबरोबर आमच्या समाज बांधवांच्या व रसिक प्रेर्मीच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करत आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने खुले नाट्यगृहाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा निधी आलेला असुन देखील अद्यापपर्यंत काम सुरू झालेले नाही.

तरी सदरची कामे लवकरात लवकर सुरू करून त्याचप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा करणे तसेच स्मारका मागील जागा लोकशाहिर. अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या नावावर हस्तांतरीत करणे या तिन्ही कामांची निश्चित तारीख व निमंत्रण पत्रिका जोपर्यंत प्रशासन देत नाही व आमचे मानसिक समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत याची प्रशासनाने दखल घ्यावी.असा उपोषणाचा इशारा मातंग समाज क्रांती मोर्चा च्या वतीने आमरण उपोषण अनिलभाऊ जाधव, संदीपभाऊ निरभवणे दौलतभाऊ शिरसाठ, रविभाऊ डोलारे,यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.सदरचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जगताप यांना उपोषणकर्त्यांनी दिले आहे.याप्रसंगी,आप्पासाहेब आव्हाड अमोल साळवे संतोष खुडे ज्ञानेश्वर सोळसे राहुल सोळसे आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते उपोषण – सोमवार दि. ३०/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता स्थळ – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ होणार आहे यांची प्रशासनाने नोद घ्यावी



