राजकिय

उत्तर अहिल्यानगर मध्ये शिवसेना बांधकाम कामगार सेना शिंदे गटाची पहिली महिला बांधकाम कामगार सेना शाखा स्थापन..!

उत्तर अहिल्यानगर मध्ये शिवसेना बांधकाम कामगार सेना शिंदे गटाची पहिली महिला बांधकाम कामगार सेना शाखा स्थापन..!

कोपरगाव शहरामध्ये शिवसेना शिंदे गट बांधकाम कामगार सेनेची उत्तर नगर जिल्ह्यातील पहिली शाखा उद्घाटन संपन्न झाले आहे कोपरगाव तालुक्यातील सोनार वस्ती येथे पहिली महिला आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न झाले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन राव औताडे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विशाल शिरसाट जिल्हाप्रमुख अहिल्यानगर, इम्रानभाई शेख उपजिल्हाप्रमुख, बाळासाहेब राहणे उपजिल्हाप्रमुख,मनिल नरोडे उपजिल्हाप्रमुख शिवाजी जाधव अभिषेक आव्हाड ,अक्षय जाधव शहर प्रमुख शिवसेना, सनी गायकवाड शहर प्रमुख युवासेना श्रीरामपुर शिवसैनिक रवींद्र जाधव बाबासाहेब भालेराव,ज्ञानेश कपिले, विनोद गंलाडे,,आदींच्या उपस्थित शाखा उद्घाटन संपन्न झाले आहे .जिल्हा सचिव किशोर चोरगे यांच्या प्रयत्नातून आणि नेतृत्वातुन शहर प्रमुख मच्छीद्र शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. या प्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन राव औताडे म्हणाले की कामगारांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही तप्तर आहे कुठली अडचण असो शासकीय स्तरावर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी असल्यास प्रथम प्राधान्याने कामगारांच्या समस्या आम्ही सोडवु, जिल्हा कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल शिरसाट यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कामगारांच्या हक्क अधिकारासाठी शिवसेनेची कामगार सेना असून कामगारांनी जास्त जास्त या संघटनेत सभासद होऊन शिवसेनेचे हात बळकट करा,असे आवाहन केले तर जिल्हा सचिव किशोर चोरगे आपल्या मनोगतात म्हणाले कि इमारत बांधकाम कामगारांची दलालाकडुन होणारी लुट आम्ही थांबवु आणि कामगारांना वरींष्ठाच्या सहकार्याने न्याय मिळवुन देऊ असे प्रतिपादन केले व आश्वासन दिले कामगारांना शासकिय योजना मिळवतांना अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा असे म्हणाले या कार्यक्रमसाठी. बांधकाम कामगार सेना जिल्हा सचिव किशोर चोरगे तालुका प्रमुख विलास जाधव तालुका सचिव मनोहर कोकाटे

शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दुल उपशहर प्रमुख संदिप बर्डे शहर संघटक सचिन नजन शहर सचिव संजय परदेशी शहर समन्वयक किरण उर्फ विजय सुर्यवंशी
शाखा प्रमुख देविदास शार्दुल उपशाखा प्रमुख प्रकाश आरणे संघटक राहुल गव्हाणे सचिव अविनाश मेहरे समन्वय किरण चव्हाण सदस्य सोमनाथ पगारे राजेंद्र खोतकर यांच्यासह महिला शाखेच्या शाखा प्रमुख जया गायकवाड उपशाखा प्रमुख कमलाबाई पवार संघटक नंदाताई पवार सचिव ताई पवार समन्वय रेखाताई पवार पदाधिकारी व कामगार सदस्य व नागरीक उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र जगताप तर आभार मच्छिंद्र शार्दुल यांनी मांडले अनेक कामगार हि उपस्थित होते

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे