महाराष्ट्र

नगरपालिका प्रशासनाने खुले नाट्यगृहाच्या कामाबाबत ची झालेली चूक लपविण्यासाठी ,जनतेला वेड्यात काढायला नाट्यगृह पाडायची नवीन शक्कल  काढली तर नाही ना :-माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

नगरपालिका प्रशासनाने खुले नाट्यगृहाच्या कामाबाबत ची झालेली चूक लपविण्यासाठी ,जनतेला वेड्यात काढायला नाट्यगृह पाडायची नवीन शक्कल  काढली तर नाही ना :-माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

गेल्या सव्वा वर्षापासून नगरपालिकेत प्रशासक आहे. त्या मुळे त्यांच्या कडेच नागरिक दाद मागणार.कोपरगाव नगरपालिकेनी खुले नाट्यगृहाचे रिपेअर करून नूतनीकरणाचे ( लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नाट्यगृह ) काम १ कोटी रुपयाचे टेंडर देऊन काढले.काम सुरू करण्याचे उद्घाटन ही साधारण १ वर्ष पूर्वी झाले. परंतु ते काम अद्याप झाले नाही.म्हणून नाट्यप्रेमीनी काम का झाले नाही .तेथील जुने बांधकामाचे काढलेले मटेरीयल व काम का झाले नाही म्हणून २६ जानेवारीला उपोषणाला बसणार म्हणून निवेदन दिले. परंतु उपोषण करणाऱ्यांना २६ जानेवारी पुरती थांबवण्यात पालिका प्रशासन यशस्वी झाले.काम का झाले नाही , किती पेमेंट कॉन्ट्रॅक्टर ला दिले , कॉन्ट्रॅक्टर कोण व बांधकामाचे आधीचे मटेरीयल व काम सुरू केले , ते काढलेले मोलाची जाड फर्ची इत्यादी मटेरीयल कुठे आहे.अशी मागणी जनतेची , उपोषण करत्यांची व नाट्यप्रेमी ची होती.ही झालेली प्रशासनाची चूक झाकण्यासाठी व ठेकेदाराला वाचवण्यासाठी नगरपालिकेने ह्या खुले नाट्यगृह चे बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करायचे आत्ता ठरवले असे गावातील कट्या वर नागरिकांन मध्ये चर्चा आहे  कळते .म्हणजे की ते दाखवणार की या बिल्डिंग चे बांधकामाचे आयुर्मान संपले , ते पडावे लागेल.असा रिपोर्ट येईल , कदाचित घेतील?मग टेंडर काढायच्या आधीच का नाही बांधकामाचे ऑडिट केले.याचा अर्थ जनतेनी व नाट्य प्रेमींनी काय घ्यावा. हा जनतेच्या करातील पैसा आहे.त्या बद्दल विचारण्याचा हक्क जनतेला आहे.आता पालिका प्रशासन त्यांची चूक लपवण्यासाठी सांगणार की रिपोर्ट आला , नाट्य गृह पाडावे लागेल.आपण नवीन बांधू.मग असे १ वर्षा पूर्वी का नाही केले. ७ , ८ वर्ष ते रिपेअर केले नाही. जनतेने मागणी केली तर ते रिपेअर चे १ कोटींचे टेंडर काढले आणि काम वेळेत झाले नाही , हे झाकण्यासाठी नवीन शक्कल युक्ती काढली असा आमचा आरोप आहे. तरी हे काम टेंडर निघून , उद्घाटन करून का झाले नाही , तसेच कॉन्ट्रॅक्टर ला किती पेमेंट दिले व कसले दिले, तसेच कॉन्ट्रॅक्टर ला वाचवण्यासाठी तर नाट्यगृह चे ऑडिट करायचे काढून ,त्याला वाचवण्यासाठी नाट्यगृह पाडायचा तर खाट्याटोप तर नाही ना ?? तसेच कॉन्ट्रॅक्टर वर कार्यवाही करायची सोडून ? आत्ता करत असलेल्या ऑडिट बाबत जनतेच्या मनात प्रशासना बाबत शंका निर्माण या पालिकेच्या अशा बचावाच्या धोरण मुळेच निर्माण झाली आहे.याचा खुलासा नगरपालिका प्रशासनाने करावा.ही मागणी जनतेच्या वतीने व नाट्यप्रेमीच्या वतीने मंगेश पाटील यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे