मतदार संघातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानचे प्रलंबित प्रश्न सोडविले – आ. आशुतोष काळे

कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. १३ मधील कब्रस्तान दुरुस्ती व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर
मतदार संघातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानचे प्रलंबित प्रश्न सोडविले – आ. आशुतोष काळे
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :-सर्व समाजाला समान न्याय देतांना समाजमंदिरासाठी कोट्यावधी निधी दिला असून मतदार संघातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानच्या दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यामुळे प्रलंबित असलेले कब्रस्तानचे प्रश्न सोडविले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.


वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान ठोक तरतूद योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. १३ मध्ये १५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या नगरपरिषद हद्दीतील मौलवी गंज गजानननगर (कोर्ट रोड) भागातील कब्रस्तान दुरुस्ती व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यानी नेहमीच सर्वधर्मसमभाव जपतांना सर्वच समाजाला मदत करून मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. हि परंपरा पुढे अबाधित ठेवून मागील साडेतीन वर्षात मतदार संघाच्या कब्रस्तानसाठी १ कोटी ८५ लाखाचा निधी दिला आहे. तसेच स्मशानभूमीचे अनेक वर्षापासूनचे मंजूर, करंजी, कोळगाव थडी, चितळीचे जागेचे प्रश्न सोडविले आहे. चांदेकसारे, सुरेगाव, धामोरी, धारणगाव, कुंभारी कब्रस्तानच्या जागेचा प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले व यापुढील काळात देखील अधिकाअधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मौलाना आसिफभाई, मौलाना मुक्तारभाई, मौलाना रियाजभाई, मौलाना यासीनभाई सय्यद, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक दिनार कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, फकिर कुरेशी, दिनकर खरे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, जावेद शेख, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, धनंजय कहार, इम्तियाज अत्तार, आंबदास वडांगळे, राजेंद्र आभाळे, नितीन साबळे, गणेश बोरुडे, मनोज नरोडे, अक्षय आंग्रे, सागर लकारे, राकेश शहा, प्रदीप मते, विलास पाटोळे, उमेश दीक्षित, परख कांबळे, लक्ष्मण सताळे, कैलास मंजुळ, तेजस साबळे, अण्णासाहेब मासाळ, सलिम पठाण, शकील खाटीक, रियाज सर, पप्पूजी सय्यद, अबुजर अत्तार, शाहबाजई पठाण, रेहान शेख, अल्तमज शेख, गयाज पठाण, अरबाज शेख, नोमान शेख, इनायत पठाण, रफिक शेख, हारूण शेख, चांदभाई पठाण, अश्पाक शेख, निसार पठाण, डॉ. जाकीर शेख, अल्ताफ शहा, मुख्याध्यापक मोबिना शेख, फरहद सिद्दीकी आदींसह नागरिक उपस्थित होते.


