महाराष्ट्र

कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा आरपिआय च्या वतीने सत्कार

कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा आरपिआय च्या वतीने सत्कार

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या बदली नंतर त्या ठिकाणी नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा कोपरगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षाच्या वतीने कोपरगाव तालुका उपाध्यक्ष अरुण खरात यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले की, मी माझ्या कारकिर्दी मध्ये गोर गरीब जनतेस निश्चितच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यातील गांव गुंडांचा बंदोबस्त करून त्यांची दादागिरी, गुंडगिरी, दहशत मोडीत काढून प्रत्येकाच्या मनात कायद्याचा धाक व आदर निर्माण करेल असे आश्वासन सत्काराला उत्तर देताना जमलेल्या कार्यकर्त्यांना दिले.यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपकराव‌ गायकवाड , तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे , जिल्हा नेते राजाभाऊ गायकवाड , शहर अध्यक्ष रामदास कोपरे , युवा अध्यक्ष सुनिल खरात , संजय कानडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड , कुसारे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे