क्रिडा व मनोरंजन

कोपरगांव येथे साकारतोय आगळा वेगळा एकल महिला फॅशन शो

कोपरगांव येथे साकारतोय आगळा वेगळा एकल महिला फॅशन शो

महाराष्ट्रातील पहिलाच एकल महिलांसाठी (घटस्फोटित,विधवा ) एकल महिलांच्या प्रतिभेचा,कलागुणांना वाव देणारा फॅशन शो

हेमंत शेजवळ शिर्डी प्रतिनिधी:- महिला दिनाच आवचित्त साधून स्टारडम इंडिया चे फाऊंडर डॉ.अशोक गावित्रे तसेच सावित्रीमाई फुले ज्ञान प्रतिष्ठानच्या सौ संगीता मालकर मॅडम याच्या संयुक्त विद्यमाने दि 11/03/2023 शनिवार रोजी कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे हिरकणी महाराष्ट्राची हा महाराष्ट्रातील पहिलाच एकल महिलांसाठी (घटस्फोटित,विधवा ) शो होत आहे,एकल महिलांच्या प्रतिभेचा,कलागुणांना वाव देणारा फॅशन शो होत आहे,कोरोना काळात साधारण 85000 स्रियांच्या पतीचे निधन झाले,अनेक स्रिया विधवा झाल्या,विधवांना प्रथम पासूनच दुय्यम वागणूक हा आपला समाज देत आला आहे,विधवांना सन्मानाने वागता यावं कुंकू लावणे,जोडवे,बांगडया घालणे हा त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग म्हणून विधवा प्रथा बंदीबाबतच हेरवाड पॅटर्न ठराव पास करण्यात ठिक ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर याचा ठराव देखील पास करण्यात आला.175 वर्षांपूर्वी ज्योतीबांच्या सावित्रीनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला,दुर्दैवाने सावित्रीमाई आम्हाला कितपत समजल्या हा प्रश्न आहे,अनेक कर्तृत्ववान स्रियांनी योगदान दिले,लढा दिला मात्र महाराष्ट्र बदलला नाही,घर, गाडया,रस्ते बदलले परंतु आमच्यातील माणूस बदलला नाही हि खरी शोकांतिका आहे.स्रियाचे प्रश्न वर्षानुवर्षा कायम आहेत,समाज कितीही पुढारलेला वाटत असला तरी स्रियाचे प्रश्न कायम आहे. मुलींच्या शिक्षणासाठी खर्चात काटकसर केली जाते परंतु लग्नासाठी कर्ज काढले जाते,स्रियाच शिक्षण व कर्तृत्व यालाच महत्व दिलं गेलं पाहिजे,स्रियांना पुरुषांमुळे त्रास होतो असा नाही तर महिलाच महिलांना त्रास देण्याच प्रमाण देखील वाढत आहे. विधवांना विधवा हा शब्द प्रयोग न वापरता पूर्णांगी हा शब्द वापरावा अशी शिफारस नुकतीच राज्य महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर यांनी राज्य शासनाला केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे