सामाजिक

विनोद जवरे राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित

विनोद जवरे राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील जवळके गावचे रहिवाशी विनोद नामदेव जवरे यांचा नुकताच राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला आहे.नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ज्ञानातंत्र बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा येथोचित सन्मान करण्यात येत असतो त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील युवा पत्रकार विनोद जवरे यांनी अत्यंत कमी वयातच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून यात प्रामुख्याने गावातील युवकांना एकत्र येत साई राजे फाउंडेशन या ग्रुपची स्थापना करत त्याद्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहे जसे की गरीब शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे उच्च शिक्षण घेत असणाऱ्यांना स्पर्धा परीक्षा करता विविध उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे आदी समाजपयोगी काम केले असून त्यामुळे त्यांना युवा आयडॉल, युवा पत्रकार, गोदाकाठ पुरस्कार, भूमिपुत्रांचा जीवनगौरव आदीं सह कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोरोना योद्धा पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत ज्ञानातंत्र बहुउद्देश संस्थेच्या वतीने जवरे यांना महानंदा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याप्रसंगी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष जाधव,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ डफाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे