ब्रेकिंग

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष रंगनाथ औताडे यांचे निधन 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष रंगनाथ औताडे यांचे निधन 

संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगांव :-    सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष रंगनाथ परशराम औताडे (९१) यांचे निधन झाले त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. माजी स्थापत्य अभियंता साहेबराव औताडे यांचे ते बंधु तर कारखान्यांचे माजी हेडक्लार्क आण्णासाहेब व आरोग्य अधिकारी आप्पासाहेब व राजेंद्र यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थीवावर पोहेगांव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.   कै. रंगनाथ परशराम औताडे हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे १९८९ ते २००६ या काळात संचालक तर ४ ऑगस्ट २००० ते २००१ या काळात उपाध्यक्ष होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे विश्वासू सहकारी होते. कोपरगांव तालुका सीड ग्रोथ संस्थेचे ते अध्यक्षही होते. मनमिळावू, स्मितभाषी स्वभावाने ते सर्वांना परिचित होते. कै. रंगनाथ औताडे यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव आदिनी शोक व्यक्त केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे