आरोग्य व शिक्षणसामाजिक

युवाक्रांति पोलिस मित्र संघटनेच्या वतीने कुंभारीत गरीब गरजू विद्यार्थांना मोफत गणवेष वाटप !

युवाक्रांति पोलिस मित्र संघटनेच्या वतीने कुंभारीत गरीब गरजू विद्यार्थांना मोफत गणवेष वाटप ! 

कोपरगाव प्रतिनिधी:-युवाक्रांति पोलिस मित्र संघटना कुंभारी यांच्या वतीने गावातील गुरूवर्य तुकाराम बाबा विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थांना मोफत गणवेष वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल यांनी युवा क्रांती पोलिस मित्र संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडे गरजू विद्यार्थ्या साठी गणवेष मिळावे अशी इच्छा व्यक्त केली होती.या पाश्र्वभुमीवर संघटनेच्या बैठकीत कुठलाही विलंब न करता विद्यार्थांना गणवेष द्यावे असा निर्णय झाला त्यानुसार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सुर्यवंशी व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष राजेंद्र बढे,कोपरगांव तालुका उपाध्यक्ष विकास खळे,कोपरगांव तालुका प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संजय भारती यांचे उपस्थितीत गणवेष वाटप  करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक शिवाजी कदम हे होते. यावेळी संघटनेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष राजेंद्र बढे, विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल सर हे आपले विचार व्यक्त  करतांना म्हणाले की,संघटनेच्या वतीने विद्यालयासाठी वेळोवेळी योग्य मदत मिळते याचा विद्यालयाला नेहमीच अभिमान असल्याचे सांगत संघटनेचे आभारही व्यक्त केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल सर, जेष्ठ नागरिक म्हाळसाकांत कदम,डॉ.सुयोग पवार,कुंभारी शाखा प्रमुख प्रमोद चिने,उपाध्यक्ष सचिन कदम,यशवंत गायकवाड,सागर कदम,कचेश्वर माळी,अमोल कदम,कुणाल कदम,योगेश शेजवळ,कोपरगांव विभाग प्रमुख अमोल ठाणगे, विद्यालयाचे  सर्व शिक्षक वृंद,कर्मचारी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक दिवे सर व आभार पावरा सर यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे