आजाद समाज पार्टी युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, विद्यार्थीनायक पँथर ऋषी पोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य पक्ष प्रवेश तथा सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन
आजाद समाज पार्टी युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, विद्यार्थीनायक पँथर ऋषी पोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य पक्ष प्रवेश तथा सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन
संपादक:- रविंद्र जगताप
श्रीरामपूर प्रतिनिधी,आजाद समाज पार्टी युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, विद्यार्थीनायक पँथर ऋषी पोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य पक्ष प्रवेश तथा सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन व्ही.आय.पी.गेस्ट हाऊस संगमनेर रोड,श्रीरामपूर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना फुल,हाराऐवजी वही व पेनद्वारे अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय राज्यघटनेचे गाढे अभ्यासक,जेष्ठ पत्रकार अहमद भाई जहागीरदार होते. तर प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक,अध्यक्ष शेख बरकत अली सर होते.बहुजन भीम पँथर सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख,महाराष्ट्र अध्यक्ष शरद भाऊ गिरी.यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.भाई चंद्रशेखर आजाद रावण यांच्या सहसी वृत्ती,रोखठोक भूमिका आदी कार्यांशी प्रभावित होऊन,पँथर ऋषी पोळ साहेब यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला.यावेळी काही महत्वपूर्ण नियुक्त्या देखील करण्यात आल्या. महिलांचे धडाडीचे नेतृत्व मुन्नाताई चावरे,अनिता म्हस्के यांच्यासह राहुरी तालुक्यातील अनेक महिलांनी आजाद समाज पार्टी चे सदस्यत्व स्वीकारले. सूचना केल्याप्रमाणे शुभेच्छा देण्यासाठी येताना अनेकांनी हार तुरे,पुष्पगुच्छ न आणता शालेय साहित्य,वह्या इ.साहित्य आणले.त्यांच्या या अनोख्या संकल्पनेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.यानंतर सर्वांनी आपल्या मनोगतातून पँथर ऋषी यांचे कार्य आणि त्यांच्यासोबत केलेले आंदोलन मोर्चे इत्यादी आठवणींना उजाळा दिला.यावेळी कार्यक्रमाला संविधान बचाव समितीचे अध्यक्ष अहमद भाई जहागीरदार,महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख बरकत अली,पँथर ऋषी पोळ यांचे वडील यशवंत पोळ व आई कविता पोळ,इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख,तिरंगा न्यूज चे संपादक असलम बिनसाद,शाकीर भाई इनामदार,साजिद भाई शेख,पत्रकार एजाज भाई सय्यद,प्रेम शेलार,शरद गिरी,उमेश मोकळकर,अक्षय ढोकचौळे,अतुल खडके,प्रणव गायकवाड,समाधान पगारे, दादाभाऊ मोरे,मुजम्मिल शेख, साजिद सय्यद,साहिल गायकवाड व मित्रपरिवार, महिला नेतृत्व मुन्नाताई चावरे, अनिताताई म्हस्के,ज्योती थोरात,नंदा सिसोदीया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शब्बीर भाई कुरेशी व गौरव भालेराव यांनी केले होते तर सूत्रसंचालन पत्रकार कासम भाई यांनी केले.



