महाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी २.२० कोटीनिधीस प्रशासकीय मान्यता – आ. आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी २.२० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता – आ. आशुतोष काळे

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव तालुक्याच्या विविध रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ३०५४-२१४१ अंतर्गत २.२० कोटी रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ.आशुतोष काळे यांनी मागील साडे तीन वर्षात रस्त्यांसाठी दोनशे कोटी पेक्षा जास्त निधी मिळविला आहे. या निधीतून बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाले असून अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित रस्त्यांना देखील निधी मिळविण्यासाठी त्यांची धडपड व पाठपुरावा सुरूच होता.त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांना २.२० कोटी निधीस  प्रशासकीय मान्यता मिळवून या रस्त्यांचा प्रश्न त्यांनी सोडविला आहे.

यामध्ये कोळपेवाडी बुवाजी बाबा मंदीर (महादू कोळपे घर) ते भडांगे वस्ती रस्ता (ग्रा.मा.१०१)ग्रा.मा. २५  मारुती मंदिर ते वडाची वाडी मार्ग (ग्रा.मा.९८)राज्य मार्ग ७ ते मोर्विस-कांदळस रस्ता (ग्रा.मा.९६)संवत्सर धोत्रे रस्ता बुवासाहेब मंदिर ते घनघाव वस्ती भोजडे रस्ता (ग्रा.मा १२५)रांजणगाव देशमुख ते गोर्डे वस्ती रस्ता (ग्रा.मा १२७)ग्रा.मा.३० मढी बु. माहेगाव देशमुख रस्त्यावरील जोर्वेकर वस्ती येथे सी. डी. वर्क करणे आदी कामांचा समावेश आहे.लवकरच या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध होवून रस्त्याच्या कामाला प्रारंभ होवून नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे. त्यामुळे वरील सर्व गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे