आत्मा मालिक ध्यान योग मिशन आयोजित आत्मा मालिक चैत्र महोत्सवाचे सहा दिवस आत्मा मलिक ध्यानपीठात भव्य दिव्य आयोजन -संत परमानंद महाराज
आत्मा मालिक ध्यान योग मिशन आयोजित आत्मा मालिक चैत्र महोत्सवाचे सहा दिवस आत्मा मलिक ध्यानपीठात भव्य दिव्य आयोजन -संत परमानंद महाराज
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव परम पूज्य सदगुरू आत्मा मालिक माऊलीच्या पावन सानिध्यात व सकल आत्मा मालिक संतपीठाच्या उपस्थितीत दिनांक १ एप्रिल ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीत कोकमठाण आश्रमामध्ये आत्मा मालिक चैत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी आत्मा मालिक ध्यान योग मिशन च्या वतीने तयारी पूर्ण झाली ख-या अर्थाने या वेळेसमा चैत्र महोत्सव म्हणजे विज्ञान, आरोग्य अध्यात्म किर्तन ध्यान व आत्मज्ञान हयाचा संगम असणारी एक महाकुंभमेळ्याची पर्वणीच आहे, अशी माहिती आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष पूजनिय संत परमानंद महाराज यानी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की तिन वर्षाच्या खंडानंतर परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊली व सकल आत्मा मालिक संतपीठाच्या सानिध्या मध्ये या सहा दिवसीय महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन भक्तपरिवारासाठी करण्यात आले आहे. या महोत्सवा दरम्यान साही दिवस सर्व भाविकांच्या सेवेसाठी आत्मज्ञानपर आधारीत विविध विषयांवरील मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने संत महंतांची प्रवचने तसेच किर्तन महोत्सव व पूर्ण उत्सवा दरम्यान दररोज विविध आजारांवरील तपासणी व उपचारांचे मोफत शिबिर आयोजित केल्याची माहिती दिली.या दिव्य महातिथीचा अमृतयोग सकल भाविकांना अनुभवण्यास मिळावा म्हणून हे विशाल आयोजन काकड आरती, मौन ध्यान,भजन,प्रवचन,हरिपाठ,सत्यांग,गुरुयाग व किर्तन महोत्सवासह महादिंडी सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

दिनांक १ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वा आत्मरूप पादूका पुजनाने या महोत्सवाची सुरवात होणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्या भाविकांनी ४५ दिवसाचे उपवास केले आहेत अशा भाविकांचा अनुष्ठान विधी संत शांतीमाई यांचे करकमलाद्वारे संपन्न होणार आहे.परमपूज्य सदगुरू आत्मा मालिक माऊली व सकल आत्मा मालिक संतपीठाच्या समवेत चैत्र शुध्द चौदस दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५. वाजता ध्यान योग विद्यासंस्थान सत्संग हॉल मधून पायी भव्य दिव्य दिंडी सोहळयास अर्थात नगर प्रदिक्षणा सोहळ्यास सुरवात होईल. या दिंडी सोहळ्यात बँड पथक, ढोलपथक, सनई चौघडा पालखी कलश यात्रा व आत्मस्थ यांचा समावेश रहाणार असून सदर दिंडी सोहळ्यात आत्मा मालिक विविध सत्संग मंडळाचे भाविक पारंपारिक वेषभूषेत सहभागी होणार आहेत. या दिंडी सोहळ्याचे विसर्जन “आत्मरूप ध्यान मंदिर” मध्ये महाआरतीने होणार आहे.या प्रसंगी बोलताना आत्मा मालिक ध्यान योग निशन चे अध्यक्ष संत निजानंद महाराज यांनी सांगितले चैत्र महोत्सवासाठी सत्संग व महाप्रसाद व्यवस्थेसाठी प्रशस्त मंडप वावस्था उभारण्यात आलेली आहे. सत्संग हॉल मध्ये अद्यायावत ध्वनिक्षेपन यंत्रणा, एल.ई.डी. स्किन लावण्यात आलेल्या आहेत. भाविकांच्या सोईसाठी आश्रमाच्या वतीने प्रसाद, स्वागत दर्शन, वाहनतळ, स्वच्छता पाणीपुरवठा, आदि समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. सहा दिवसीय या महोत्सवासाठी येणा-या भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण आत्मा मालिक ध्यानपीठ ऑफिशीयल या यू-ट्यूब चॅनेल वरती केले जाणार आहे.उत्सवा दरम्यान चालू होणा-या अखंड अन्नछत्रा बधल माहिती देताना संत विवेकानंद महाराज यांनी सांगितले प्रसादालय समितीच्या वतीने उत्सव काळात भाविकांसाठी अहोरात्र महाप्रसाद व्यवस्था सुरू रहाणार आहे. भाविकांसाठी पंचपक्वानाचे भोजन देताना त्या मध्ये पुरी, चपाती, भाजी, वरणभात मठ्ठा, जिलेबी, आमरस, श्रीखंड असे निरनिराळे मिष्ठान्न दिले जाणार आहेत तसेच पिण्यासाठी थंड आर ओ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.’महाप्रसादाची सर्व व्यवस्था व सेवा ही प्रसादालय समितीचे प्रमुख श्री प्रकाश भट, श्री बाळासाहेब गोरडे, श्री प्रकाश गिरमे व त्यांची संपूर्ण टीम संभाळणार असून आश्रमातील विविध विभाग भाविकांच्या अखंड सेवेसाठी सज्ज रहाणार आहे.पत्रकार परिषदेच्या वेळी आत्मा मालिक ध्यान योग मिशन चे अध्यक्ष संत निजानंद महाराज, कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज, आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे सदस्य संत विवेकानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत सत्यान्नानंद महाराज संत साधनानंद महाराज, संत आनंद महाराज, संत राजनंद महाराज, संत जितेंद्रानंद महाराज, संत किरणानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज, संत विजयानंद महाराज, संत योगानंद महाराज, संत पठारे महाराज, संत सेवादास महाराज, संत शेलार महाराज, संत सर्वेशानंद महाराज संत प्रभावती माई संत स्मृतीमाई, विश्वस्त श्री बाळासाहेब गोरडे व सकल संत व संतमाता उपस्थित होते.


