वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनास यश,प्रशासनाचे आभार
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनास यश,प्रशासनाचे आभार
संपादक:- रविंद्र जगताप
नुकतेच धारणगांवरोड वरील टपर्या हटवून अतिक्रमण काढण्यात आले होते सदर याठिकाणी अनेक वर्षापासून गोर गरीब व्यवसायिक आपला उदरनिर्वाह करत आहे.या महागाईच्या जमान्यात व्यावसायिकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली होती.तरी कोपरगांव नगरपरिषद प्रशासनाने सदर व्यावसायिकांना त्या जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी देवून पूनर्वसन करण्यात यावे. यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून तालुका अध्यक्ष नितिन बनसोडे यांनी तीव्र स्वरुपाचे आंदोलन इशारा दिला होता. गोर गरिब टपरीधारक व्यवसायीकांना व्यवसायासाठी परवानगी दिली.त्याबद्दल .याप्रसंगी शरद खरात उत्तर महाराष्ट्र संघटक,वंचितचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितिन बनसोडे, ,महासचिव गौतम बनसोडे,सचिव शकील चोपदार,शहराध्यक्ष शुभम शिंदे,कोपरगाव युवा शहराध्यक्ष शकील तांबोळी वंचित बहुजन आघाडीच्या कोपरगाव शहर कार्यकारिणीची वतिने प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले




