देश-विदेशराजकिय

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान अजिबात सहन करणार नाही -स्नेहलताताई कोल्हे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान अजिबात सहन करणार नाही -स्नेहलताताई कोल्हे
संपादक :- रविंद्र जगताप
-कोपरगावात भाजप व मित्र पक्षांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ विशाल यात्रा
कोपरगाव : भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर संबोधून त्यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. प्रखर राष्ट्रभक्ती व हिंदुत्वाचा विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे समस्त भारतीयांचे दैवत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर शंका घेऊन त्यांचा अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यांचा अपमान आम्ही मुळीच सहन करणार नाही. यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात सावरकरप्रेमी जनता रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देईल, असा सज्जड इशारा भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी दिला.
जाहिरात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट)  च्या वतीने गुरुवारी (६ एप्रिल) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ कोपरगाव शहरातून भव्यदिव्य स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. त्यावेळी स्नेहलताताई कोल्हे बोलत होत्या. शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालयापासून वाजतगाजत निघालेल्या या यात्रेत भाजप, भाजयुमो व रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते व सावरकरप्रेमी नागरिक ‘मी सावरकर’ असा उल्लेख असलेल्या टोप्या घालून व हातात विविध फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या यात्रेत सामील झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा जयघोष करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘सावरकर के सन्मान में, भाजपा मैदान में’, ‘गर्जे सारा हिंदुस्थान, व्यर्थ न ठरवू हे बलिदान’, ‘होश मे आओ, राहुल गांधी होश मे आओ’, ‘सावरकरजी अंगार है, बाकी सब भंगार है’, ‘देशभक्तों का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले होते.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रखर देशभक्ती, राष्ट्रभक्ती, हिंदुत्ववाद प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे; परंतु वारंवार त्यांच्याविरोधात बोलून त्यांचा अपमान केला जात आहे. भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान देश कदापिही विसरू शकत नाही. सावरकरांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यावर पुस्तक लिहिले. त्यांनी लाखो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. एकाच व्यक्तीला दोन जन्मठेप झाल्या, असे वीर सावरकर एकमेव आहेत. ब्रिटीश सरकारने दोन जन्मठेपांची शिक्षा ठोठावल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांना म्हणाले होते की, तुम्ही दोन जन्मठेपांची शिक्षा मला देता तोपर्यंत तुमचे राज्य राहणार आहे का? हे सांगण्याची धमक असलेले वीर सावरकर होते. जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर वीर सावरकरांनी ज्या यातना भोगल्या, त्या कुणाच्याही वाट्याला आल्या नाहीत. वीर सावरकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधात लढा दिला. हिंदुत्वाचा विज्ञाननिष्ठ विचार मांडला. मराठी भाषेला शेकडो शब्द दिले. सावरकरांनी जो शाश्वत विचार मांडला आहे, तो कुणीच समाप्त करू शकत नाही.
स्नेहलताताई कोल्हे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करून त्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संपूर्ण भारतीयांचे दैवत आहेत. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य करून सावरकरांच्या प्रखर देशभक्तीचाच नव्हे तर समस्त भारतीयांचा अपमान केला आहे. राहुल गांधींचे स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचे वक्तव्य अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे. आभाळाएवढे विशाल व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलण्याची राहुल गांधींची पात्रताच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्या बोलण्याने त्यांची उंची अजिबात कमी होणार नाही. राहुल गांधी, तुम्ही मोठा अक्षम्य अपराध केला आहे, आता तरी मनाचा मोठेपणा दाखवा आणि भारतीयांची माफी मागा. राहुल गांधी असो व इतर कोणी असो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कोणी केला तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजयुमोचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, न. प. तील माजी गटनेते रवींद्रअण्णा पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कैलास खैरे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगरसेवक नयनकुमार ऊर्फ बबलू वाणी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, माजी नगरसेविका विद्याताई सोनवणे, मंगलताई आढाव, दीपाताई गिरमे, नारायणशेठ अग्रवाल, जयेश बडवे, वैभव गिरमे, अंबादास देवकर, सुनील देवकर, उत्तमराव चरमळ, कैलास रहाणे, विजय डांगे, अनिल शिंदे, सुरेश जाधव, विजय जामदार, राजेंद्र चांडे, विजय जाधव, हरिभाऊ लोहकणे, सुधाकर गाढवे,अंकुश कुऱ्हे, डॉ. गोरक्षनाथ मोरे, रवींद्र वल्हे, प्रशांत वाबळे, निखील औताडे, लक्ष्मीकांत संवत्सरकर, बापू वाणी, नसीरभाई सय्यद, पुंजाभाऊ राऊत, हरिभाऊ लोहकणे, सुधाकर गाढवे, रवींद्रअण्णा पाठक, कैलास खैरे, प्रभाकर आव्हाड, सुशांत खैरे, जयेश बडवे, रिपाइं नेते जितेंद्र रणशूर, पिंटू नरोडे, शिवाजीराव खांडेकर, प्रसाद आढाव, खालिकभाई कुरेशी, अल्ताफभाई कुरेशी, संजय जगदाळे, राजेंद्र बागुल, दादासाहेब नाईकवाडे, महेश खामकर,सुशांत खैरे, रवींद्र लचुरे, वैभव आढाव, सचिन सावंत, रवींद्र रोहमारे, फकिर मोहम्मद पहिलवान, देवराम पगारे, सलीम पठाण, सतीश रानोडे, जयप्रकाश आव्हाड, अनिल गायकवाड, हाशमभाई, शफिक सय्यद, हुसेन सय्यद, संतोष साबळे, गोपीनाथ गायकवाड, रवींद्र नरोडे, शरद त्रिभुवन, सिद्धू भाटिया, गजू खिलारी, बापू पवार, सलीम मन्सुरी, अंकुश जोशी, अण्णा खरोटे, मुन्ना दरपेल, रज्जाक पटेल, किरण सुपेकर, विक्की सोनवणे, नरेंद्र लकारे, राहुल सूर्यवंशी, चंद्रकांत वाघमारे, रोहन दरपेल, गोपीनाथ सोनवणे,प्रभुदास पाखरे, कैलास गवारे, विजयराव चव्हाणके, आशिष उदावंत, अय्युब बागवान, रमेश भोपे आदींसह भाजप, भाजयुमो व रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी, भाजप बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, विविध संस्थांचे आजी-माजी संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे