महाराष्ट्रसामाजिक

कार्यक्षेत्राबाहेरील जात पडताळणी समिती आणण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन

कार्यक्षेत्राबाहेरील जात पडताळणी समिती आणण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन

अमित आगलावे जिल्हाध्यक्ष आदिवासी महादेव कोळी युवक संघटना. यांच्या वतिने दिले निवेदन

कोपरगाव:- अहमदनगर जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे कार्यालय नाशिक येथे एकाच ठिकाणी असून त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील व तिच्या कार्यक्षेत्रातील दहा लाख आदिवासी बांधवांना विनाकारण नाशिक येथे जाऊन हेलपाटे मारावे लागत आहेत तसेच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत हा त्रास थांबवण्यासाठी चे निवेदन सन्माननीय शिवसेनाप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांना कोपरगाव दौऱ्याच्या निमित्ताने समक्ष भेटून श्री अमित आगलावे व शिष्टमंडळाने दिले याप्रसंगी यावर निश्चित मार्ग काढण्याचे आश्वासन सन्माननीय शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिले तसेच यावेळेस माजी खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेब संपर्कप्रमुख आमदार श्री सुनील शिंदे साहेब इत्यादी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे