ब्रेकिंग

नवीन व्यापारी संकुल उभारण्यासाठी आ. आशुतोष काळेंनी घेतला आढावा

नवीन व्यापारी संकुल उभारण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतांना आ. आशुतोष काळे.

नवीन व्यापारी संकुल उभारण्यासाठी आ. आशुतोष काळेंनी घेतला आढावा

कोपरगाव  :- कोपरगाव शहरातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी व्यवसायिकांना सर्व सुविधांयुक्त नवीन व्यापारी संकुल उभारण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून आढावा घेतला.कोपरगाव शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लावला आहे. कोपरगाव शहरातील सर्वच रस्त्यांना व शहर सुशोभिकरणाला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे रस्ते चकाचक होऊन कोपरगावमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

कोपरगाव शहराची बाजारपेठ पुन्हा फुलवायची असेल तर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सर्व प्रकारची खरेदी कोपरगाव शहरातच करता यावी व मोठ्या शहरामध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना व्यापारी संकुलात कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल त्यासाठी व्यापारी संकुल उभारण्यासाठी कोणत्या जागा कोपरगाव नगरपरिषदेकडे उपलब्ध आहेत. नवीन कोणत्या जागेवर अद्यायावत व्यापारी संकुल उभारणे कोपरगाव शहराच्या बाजार पेठेला आर्थिक चालना देवू शकेल याबाबत आ. आशुतोष काळे यांनी सविस्तर माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी या बैठकीसाठी  कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांतारामजी गोसावीसहाय्यक नगररचनाकार दिपकजी बडगुजरआर्किटेक्ट राजेंद्रजी मुंजे आदी उपस्थित होते.

     

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे