सामाजिक

साडे तीन वर्षात पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळाली :- आ. आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी . आशुतोष काळे.

साडे तीन वर्षात पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळाली :- आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा विकास साधतांना मतदार संघाच्या सर्व गावांना विकासात सहभागी करून घेतले असून मागील साडे तीन वर्षात दिलेल्या कोट्यावधीच्या निधीतून पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे ४ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या प्र.जि.मा. ५ रवंदे-टाकळी-पवार गिरणी-संवत्सर-भोजडे-धोत्रे रस्ता डांबरीकरण करणे तसेच २० लक्ष रुपये निधीतून इजिमा २१५ धोत्रे ते वारी रस्ता डांबरीकरण करणे व १० लक्ष रुपये निधीतून दिलीप रोकडे घर ते घोयेगाव चौफुली रस्ता खडीकरण करणे कामाचे या ४ कोटी ३० लाखाच्या कामांचे भूमिपूजन व मस्जिद परीसरातील पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाचे लोकार्पण नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले कीपूर्व भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहे. कोकमठाण व परिसराच्या गावातील नागरिकांचे श्रद्धास्थान श्री लक्ष्मीमाता देवस्थान तसेच वारी व परिसराचे श्रद्धास्थान असलेल्या वारी येथील श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला. पूर्व भागातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांची विजेच्या समस्या दूर करण्यासाठी वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविली. नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षापासून त्याच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नव्हता. त्यासाठी पाठपुरावा करून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून दिला. पूर्व भागातील गावा-गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना व कोपरगाव शहराला जोडणाऱ्या रस्त्यांना निधी देवून दळणवळणाची समस्या सोडविली. संवत्सरला ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहत तसेच तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला देखील मंजुरी मिळवून पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. पूर्व भागातील वारी येथील गोदावरी नदीरील पूल, वारी-शिंगवे रोड, प्र.जी.मा. ९९, शिरसगाव, तिळवणी अशा अनेक महत्वाच्या पुलांचा प्रश्न सोडवून अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना देखील मार्गी लावून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून पूर्व भागाच्या विकासाला चालना दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मस्जिद परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धोत्रे येथील मुस्लिम बांधवांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला.

 

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारेसंचालक सुरेश जाधवजिनिंग, प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारमाजी पं. स. सदस्य मधुकर टेकेराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगरतालीफ सय्यदशिवनाथ पाडेकरदेविदास जानरावसंजय चव्हाणमोहम्मदशेखचांगदेव चव्हाणरमेश भोसलेनवनाथ पाडेकरराजेंद्र माळोदेनिवृत्ती जामदारगणेश घाटेकचेश्वर गागरेगणेश माळोदेसचिन जामदारविजय जामदारसंजय जामदारविनायक देवकरअविनाश पगारेदिलीप रोकडेवसंतराव चव्हाणगंगाधर रोकडेकैलास जामदारश्रीरंग शिंदेजनार्दन शिंदेअरुण पाडेकरअन्वरशेखभारत चव्हाणसुनील माळोदेदिलीप जामदारअण्णासाहेब जामदारपंडितराव जानरावराधाकृष्ण चन्नेज्ञानदेव कोतकरप्रशांत पाडेकरनानासाहेब जानरावअशोक जामदारनारायण जामदाररवींद्र जामदारशिवाजी वारकरबाळासाहेब वारकरजालिंदर वारकरबाळासाहेब वारकरसंभाजीराव नवलेप्रदीप भवरमनोज जगतापबाबासाहेब नवलेगणेश वारकरकिशोर मोरेविजय साबळेअजित सिनगरभाऊसाहेब भवरशहाराम नाईकवाडेसुरेश मारुती जाधवमच्छिंद्र जामदारअंबादास चव्हाणगंगाधर कांबळेसुरेश मुळेदिलीप माळोदेभाऊसाहेब देवकरवाल्मीक सिनगरसुधाकर वादेअरुण साळुंकेगंगाधर रोकडेअमोल शिंदेकिरण माळोदेविशाल वैद्यचांगदेव कोतकरअरुण घाटेविनायक देवकरवैभव थोरातजावेद शेखकिरण चव्हाणसाहेबराव माळोदेअरुण पाडेकरराजेंद्र जामदारगोरक्षनाथ भवरअरुण शिंदेसंजय भवरआबासाहेब डुकरेरघुनाथ टूपकेअशोक टूपकेजनार्दन भवरतुकाराम टूपके,मौलाना मोहम्मदभाई शेखतालिब सय्यदनासिर सय्यदअश्पाक शेखकौसर शेखजामिल शेखआरिफ शेखइलियाज पठाणइम्रान सय्यदरियाज सय्यदनईमशेखरसूल शेखनौसद शेखसादिक शेख आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे