ब्रेकिंग

नाटेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे अंबादास मोरे व्हा. चेअरमनपदी घमाजी मोरे यांची बिनविरोध निवड

नाटेगाव सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन करतांना सदस्य  व कार्यकर्ते.

नाटेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे अंबादास मोरे व्हा. चेअरमनपदी घमाजी मोरे यांची बिनविरोध निवड

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव विविध सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत काळे गटाचे अंबादास धोंडीबा मोरे यांची चेअरमनपदी तर घमाजी सुकदेव मोरे यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.नाटेगाव सोसायटीची सत्ता काळे गटाकडे असून रोटेशन पद्धतीनुसार विद्यमान चेअरमन गणेश मोरे व व्हा. चेअरमन सौ. भारती पिंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सोसायटीच्या रिक्त असलेल्या चेअरमन, व्हा. चेअरमनपदासाठी निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदासाठी अंबादास धोंडीबा मोरे व व्हा. चेअरमनपदासाठी घमाजी सुकदेव मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. चेअरमन, व्हा. चेअरमनपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज मुदतीच्या आत दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ  यांनी अंबादास धोंडीबा मोरे यांची चेअरमनपदी तर घमाजी सुकदेव मोरे यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.निवडणूककामी सोसायटीचे सचिव दत्तात्रय वाघ यांनी सहकार्य केले. यावेळी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित संचालकांनी व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक गणेश मोरे, बाळू मोरे, सतीश मोरे, सौ. भारती पिंगळे, सौ. लीलाबाई मोरे, सौ. रंजना मोरे, संतोष मोरे, भरत भालके आदी सदस्यांसह काळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन अंबादास मोरे व व्हा.चेअरमन घमाजी मोरे यांचे माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिंनदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे