संपादकीय
कोपरगाव च्या वाट्याला काय ?
कोपरगाव च्या वाट्याला काय ?
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही? अनेक वेळा तर्क वितर्क लावले जातात १ मे आला की त्याचबरोबर १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आला की, जिल्हा विभानाच्या चर्चा जोरदार होत असतात नुकतेच १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात साजरा करण्यात आला यावेळेस देखील अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील विविध प्रस्तावित जिल्हा विभाजनाचा असलेला प्रश्नांची चर्चा यावेळी झाली. १ मे त्याचबरोबर १५ ऑगस्ट २६ जानेवारी रोजी अनेक जिल्ह्यांच्या विभाजनाचा प्रश्न मीडियाच्या माध्यमातून चर्चा आणला जातो. यावेळेस देखील विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर आला नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचे विभाजनाचे अनेक अडचणी असल्या तरी या अहमदनगर जिल्ह्यासाठी कोपरगाव त्याचबरोबर संगमनेर श्रीरामपूर शिर्डी अशा चार ठिकाणाहून जिल्हा विभाजनाची मागणी पुढे येत आहे त्यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून मुख्यालय कोणत्या ठिकाणी व्हावे याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु अहमदनगरचे विभाजन होईल तो होईल परंतु कोपरगावच्या वाटेला काय हा प्रश्न कोपरगावकरांना पडत आहे कारण तसेही आहे .कोपरगाव तालुक्यात कोपरगाव जिल्ह्याची मागणी होत आहे कोपरगाव जिल्हा करण्यासाठी कोपरगाव जिल्हा कृती समितीच्या वतिने पत्रकार रविंद्र जगताप,सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी या संदर्भात आंदोलन देखील केले आहे. आता कोपरगाव च्या वाटेला काय जिल्हाच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे. अहमदनगरचे विभाजन होणार त्यामुळे मुख्यालय ज्या ठिकाणी होणार त्या ठिकाणी जिल्हास्तरावरील अनेक कार्यालय येणार ,त्या पार्श्वभूमीवर तशा प्रकारची तयारी देखील होत असते आता अहमदनगर. जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्यामुळे विभाजन होवुन नविन जिल्हा होणारच आहे.मात्र कोपरगावचे काय? कोपरगावला याचे काय मिळणार हाच प्रश्न आहे आता सध्या अनेक कार्यालय उत्तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत आहे परंतु कोपरगावच्या वाटेला काय हा कोपरगावकरांना प्रश्न पडत आहे.जिल्हा मुख्यालयाच्या दृष्टीने अनेक कार्यालये उत्तर अहमदनगर जिल्हयात येत आहे यापूर्वी श्रीरामपूर येथे आरटीओ परिवहन कार्यालय, जिल्हा न्यायालय, अप्पर पोलीस अधीक्षक, विभागीय एसटी कार्यशाळा, भारत सरकारचे जिल्हास्तरीय पोस्ट कार्यालय, दूरसंचार कार्यालय, पासपोर्ट कार्यालय,असे अनेक कार्यालये श्रीरामपुरला झाली.यासाठी संगमनेर व श्रीरामपुरमध्ये रस्सीखेच झाली.शिर्डीला मात्र काहीच करायची गरज नाही.जागतिक स्तरावरील धार्मिक क्षेत्र असल्याने शासन प्रशासन शिर्डी कडे विशेष लक्ष देते.परंतु कोपरगावचे काय हा प्रश्न सामान्याना नेहमी पडतो.कोपरगावला विविध कार्यालये आल्यास कोपरगावात रोजगार वाढेल.आणि शासकीय कामासाठी हेलपाटे मारावे लागणार नाही.काही दशकापुर्वी कोपरगाव तालुका खुप मोठा होता.आजचा श्रीरामपुर देखील कोपरगावात होता.शिर्डी देखील कोपरगाव तालुक्यात होती.त्यामुळे ज्येष्ठते नुसार कोपरगावच जिल्हा मुख्यालय व्हायला हवे.आता पुन्हा एक नविन कार्यालयाची जोरदार चर्चा आहे.प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपुर मध्ये करावे यासाठी श्रीरामपुरकर आंदोलन करत आहे.त्याच बरोबर संगमनेरकर देखील आंदोलन करत आहे.आणि नेहमी प्रमाणे शिर्डीकराची मागणी नसतांनी शासन प्रशासन शिर्डीला पसंती देत आहे.यात कोपरगकरांचे काय, कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते नागरिक,लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक संघटनांनी लक्ष वेधले पाहिजे.आणि कोपरगावसाठी लढले पाहिजे.
लेखन :- रविंद्र जगताप संपादक सत्य एक्सप्रेस


