सामाजिक

स्व. दौलतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या शेडचे जेऊरकुंभारी ग्रामपंचायतकडे हस्तांतर, मिलन चव्हाण यांचा सत्कार.

स्व. दौलतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या शेडचे जेऊरकुंभारी ग्रामपंचायतकडे हस्तांतर, मिलन चव्हाण यांचा सत्कार.
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव:- तालुक्यातील जेऊरकुंभारी येथे अमरधामच्या बाजूला कै. दौलतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ गावचे भूमिपुत्र मिलन चव्हाण यांनी गंगेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे पाच लाख रुपये खर्चाचे संरक्षक कंपाउंडसह पत्र्याचे शेड बांधले ते रामनवमीच्या मुहूर्तावर जेऊरकुंभारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच सुवर्णा पवार यांच्याकडे सुपूर्द केले. ग्रामस्थांच्या वतीने मिलनकुमार चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीचे माजी व्यवस्थापक भिमराज वक्ते, माजी संचालक मधुकर वक्ते, कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, सतीश आव्हाड,माजी सभापती शिवाजीराव वक्ते, गोदावरी केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, रिपाईचे नेते दीपक गायकवाड, शिवाजी भाऊसाहेब वक्ते, शिवाजी वक्ते, गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश वक्ते, कोंडीराम वक्ते, सरपंच महासंघाचे अध्यक्ष जालिंदर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यशवंत आव्हाड, बाजीराव वक्ते, कॉन्ट्रॅक्टर सिद्धेश दौंड, बापूराव वक्ते, महेंद्र वक्ते, सोसायटीचे उपाध्यक्ष दादासाहेब चव्हाण, खादी ग्रामोद्योग संस्थेचे अध्यक्ष पगारे, किशोर वक्ते, विक्रम शिंदे, आनंद बारशे, भिकाजी चव्हाण ,अशोक वक्ते, संतोष वक्ते,अदी उपस्थित होते.माजी सभापती शिवाजीराव वक्ते यांनी सांगितले की कै. दौलतराव पिराजी चव्हाण हे नेहमी सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असायचे त्यांचाच वारसा त्यांचे कुटुंब पुढे चालवत आहे. त्यांच्या स्मरणार्थ मिलनकुमार चव्हाण यांनी सुमारे पाच लाख रुपये खर्च करून बांधलेले शेड  जेऊरकुंभारी परिसरातील ग्रामस्थांना विविध धार्मिक कार्यक्रमासाठी वापरात येणार आहे.   लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार व गंगेश्वर महादेव मंदिर पिंड देखभाल करण्याची सूचना संचालक बाळासाहेब वक्ते यांनी मांडली, त्यावर गावकऱ्यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे सुचित केले.  शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष मधुकरराव वक्ते यांनी आभार मानले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे