जेऊर कुंभारी स्मशानभूमीस दिली शवदानी
जेऊर कुंभारी स्मशानभूमीस दिली शवदानी
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील स्मशानभूमीस जिल्हा परीषद निधीतूनअंदाजे ८० हजार रुपये किमतीची एक शवदानी दिल्याची चे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी सांगीतले आहे त्याबद्दल आज दिनांक ८ मे रोजी पंचायत समिती.कार्यालयात कोपरगाव येथे जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने सचिन सर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आलायाप्रसंगी माजी सभापती शिवाजीराव वक्ते,माजी संचालक मधुकर वक्ते,माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड,माजी सरपंच कैलासराव वक्ते,ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव आव्हाड, प्रदीप गायकवाड,संजय वक्ते, बाळासाहेब पवार, तुषार गुरसळ, भाऊसाहेब वक्ते, करणा वक्ते, दत्तात्रय वक्ते,मधुकर वक्ते आदी उपस्थित होते. याप्रसंगी स्मशानभूमी परिसर सुशोभीत करण्यासाठी न.रे.गा. योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे तसेच आगामी काळात गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी गावासाठी नवनवीन योजना राबवण्यासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन शिवाजीराव वक्ते यांनी केले आहे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपसरपंच ताराचंद लकारे यांनी तर आभार माजी संचालक मधुकर वक्ते यांनी मानले.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2




