राज्यात बारसू तर कोपरगाव शहरामध्ये मुतारीची चर्चा
संपादकीय
राज्यात बारसू तर कोपरगाव शहरामध्ये मुतारीची चर्चा
महाराष्ट्र राज्यामध्ये बारसू प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात राजकारण चालू आहे .महाराष्ट्र मध्ये बारसु प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे अनेक दिवसांपासून समर्थनात आणि विरोधामध्ये आंदोलने त्याचबरोबर चर्चा चालू आहे. बारसू येथे रिफायनरी होणार असून या रिफाईनेमुळे अनेकांना रोजगार देखील मिळणार आहे त्याचबरोबर दुसरी बाजू म्हणजे नैसर्गिक बाजूने आपण बघितल्यास या ठिकाणी नैसर्गिक हानी सुद्धा होणार आहे त्यामुळे या बारसू प्रकल्पाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा चालू आहे यातच आपल्या कोपरगाव मध्ये सुध्दा एका मुतारीची जोरदार चर्चा चालु आहे . कोपरगाव मध्ये सध्या मुतारीच्या आंदोलनाची चर्चा चालू आहे कोपरगाव शहरामध्ये मुतारीचा प्रश्न बघितला तसा गंभीरच आहे काही वर्षांपूर्वी कोपरगाव मध्ये अनेक ठिकाणी स्वच्छतागृह मुताऱ्या होत्या. परंतु गेल्या काही अलीकडच्या काळामध्ये अनेक मुताऱ्यात तोडल्या गेल्या त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा स्वच्छतागृहेते नाही त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो .कोपरगावात अनेक महत्त्वाची चौक आहेत त्या ठिकाणी पूर्वी काही स्वच्छतागृहे होती परंतु आता ती स्वच्छतागृहे पडली पाडण्यात आली त्यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे सध्या अशाच एका मुतारीची चर्चा कोपरगाव मध्ये चालू आहे कोपरगाव शहरामध्ये एका ठिकाणी मोठे बांधकाम चालू असून त्या ठिकाणी अनेक वर्षांपासूनची स्वच्छतागृह मुतारी आहे ती मुतारी पडली असून त्यासाठी ती मुतारी परत बांधून देण्यात यावी यासाठी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन यासाठी आंदोलन केले आहे कोपरगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतागृहाची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली या सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी प्रश्न मांडले अनेक ठिकाणी स्वच्छतागृह होती आज त्या ठिकाणी स्वच्छतागृह नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा गेल्या काही दिवसापूर्वी शहरामध्ये महिला स्वच्छतागृहाची चर्चा रंगली होती त्यानंतर कोपरगाव मध्ये काही नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन केली त्यानंतर भाजी मंडई या ठिकाणी महिलांसाठी एक मात्र शहरातील स्वच्छतागृह आहे परंतु शहरांमध्ये अनेक ठिकाणी आजही स्वच्छतागृहांची गरज असून स्वच्छतागृहे झाली पाहिजे आता या स्वच्छतागृहाची सध्या कोपरगाव शहरांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे त्यासाठी त्यांनी एक आंदोलन देखील केले आहे सामूहिक प्रतीकात्मक मूत्र विसर्जन आंदोलना यामुळे या आंदोलनाची चर्चा कोपरगाव शहरामध्ये रंगत आहे राज्यात बारसू तर कोपरगाव मध्ये स्वच्छतागृहाची चर्चेने जोर धरला आहे
लेखन रविंद्र जगताप संपादक
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2


