महाराष्ट्र

कोपरगाव हे जिल्हाचे मुख्यालय किंवा जिल्हा झाला पाहिजे यासाठी श्रीरामपूरकरां प्रमाणे बंद ची हाक दिली पाहिजे :- मंगेश पाटील माजी नगराध्यक्ष

कोपरगाव हे जिल्हाचे मुख्यालय किंवा जिल्हा झाला पाहिजे यासाठी श्रीरामपूरकरां प्रमाणे बंद ची हाक दिली पाहिजे :- मंगेश पाटील माजी नगराध्यक्ष

संपादक:-रविंद्र जगताप

कोपरगाव जिल्हा झाला पाहिजे.कोपरगाव हेच जिल्हा मुख्यालयासाठी योग्य असुन कोपरगावकरांनीही मागणी आणि आंदोलन करायला पाहिजे. कोपरगाव जिल्हा किंवा जिल्हाचे मुख्यालय झाले तर नुसतेच शहराची नाही तर संपूर्ण तालुक्याची कायम स्वरुपी बाजारपेठ सुधारून जाईल. रोजगार मोठ्या प्रमाणात वाढेल.कोपगावाला भरपूर सरप्लस निधी मोठा मिळेल.खूप विकास होईल.जे अनेक वर्षांपासून आज पर्यंत प्रत्येक नागरिकांना वाटते की आपले कोपरगाव हे पूर्वी प्रमाणे कॅलिफोर्निया झाले पाहिजे. आणि कोणताच मुलगा गाव सोडून जाणार नाही व रिटायर्ड सिटी हे नाव पुसले जाईल.सर्वे छोट्या मोठ्या व्यापारी मंडळींनी , तरुणांनी , महिला मंडळांनी पक्ष विरहित या साठी पुढे, युन पुढाकार घेऊन आपल्या गावच्या व्यापार वाढीसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी पुढे आले पाहिजे.आजुन वेळ हातात आहे.तरी सर्वांनी ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मागणी साठी पुढे आले पाहिजे. पक्ष विरहित आपल्या आपल्या नेते मंडळीना घेऊन हे केले तर यश यू शकते. अन्यथा पुढची पिढी ,तरुण वर्ग माफ करणार नाही. व ही आलेले विकासाची संधी कोपरगावकर कायम स्वरुपी मुकतील.तरी आत्ताच परत शासनाकडे मागणी केली पाहिजे.बंद ची हाक दिल्याने शासन गांभीर्याने विचार करेल.कोपरगाव हे हायवे ला आहे.रेल्वे स्टेशन, मोठे बस स्टँड , विमानतळ हे कोपरगाव तालुक्यात आहे , समृध्दी चे लँडिंग कोपरगाव च्या हद्दीत आहे , शेती महामंडळाच्या जमिनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.पौराणिक धार्मिक पर्यटन स्थळ ही आहेत.असे अनेक जिल्हा होण्यासारखा गोष्टी तालुक्यात आहेत.या साठी सर्वांनी एकत्र येवुन मागणी करावी.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे