कोपरगाव शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा आ.आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना
पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्याकडे कोपरगाव शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या अडचणी मांडताना कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शिष्ट मंडळ
कोपरगाव शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा आ.आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांकडून व्यावसायिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या थांबविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून कोपरगाव शहराची कायदा सुव्यस्था अबाधित ठेवावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था काहीशी बिघडली असून होत असलेल्या अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या त्यामुळे नागरिक त्रासले असून रात्रीच्या वेळी व्यवसायिकांना पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्ट मंडळाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत दाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांची भेट घेतली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी भ्रमणध्वनी वरून पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्याशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या.कोपरगाव शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे त्या पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. शहरात विविध भागात हाणामाऱ्या होत असल्याच्या घटना घडत आहे. कोरोनाचे दोन वर्ष व्यावसायिकांसाठी अत्यंत अडचणीचे होते. त्यामुळे सर्वच व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले होते. हि परिस्थिती आता पूर्णपणे निवळली असून छोट्या मोठ्या व्यावसायिकांची रुळावरून घसरलेली व्यवसायाची गाडी हळू हळू रुळावर येत असतांना रात्री दिलेल्या वेळेच्या आत व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या व्यावसायिकांना पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्याबाबत व्यवसायिकांच्या असंख्य तक्रारी येत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यस्था धोक्यात येवू शकते. त्यासाठी पोलीस प्रशासनाने छोट्या मोठ्या व्यावसायिकांना रात्री ११ पर्यंत व्यवसाय करू द्यावा. चोरीच्या गुन्ह्यातील गुनेगारांचा तपास लावून त्या गुन्हेगारांना जेरबंद करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून कोपरगाव शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाघचौरे, कृष्णा आढाव,सुनील शिलेदार,फकीर कुरेशी, कार्तिक सरदार, अशोक आव्हाटे, मनोज नरोडे, शैलेश साबळे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, एकनाथ गंगुले, विजय नांगरे, चंद्रकांत धोत्रे, आकाश डागा, शिवाजी कुऱ्हाडे,ऋतुराज काळे,आशुतोष देशमुख आदि उपस्थित होते.