महाराष्ट्र

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम येथे राजमाता जिजाऊ व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी साजरी

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम येथे राजमाता जिजाऊ व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी साजरी

संपादक:- रविंद्र जगताप

राजमाता जिजाऊंच्या व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निम्मित कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून मानवंदना दिली. राजमाता जिजाऊ या अवघ्या महाराष्ट्राला वंदनीय,आदर्श माता. स्वराज्याचे स्वप्न उरी धरून त्यांनी शिवबांना घडविले. शिक्षण, न्याय, व्यवहारज्ञान, राज्यकारभार असे अनेक गुण आपल्या अपत्याच्या अंगी यावेत यासाठी त्या सतर्क राहिल्या. स्त्रीच्या खंबीर, निर्धारी रुपाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाबाई. प्रत्येक स्त्रीसाठी जिजाऊ आदर्श आहेत. तसेच १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने व धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर, सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी उर्जा निर्माण केली. राजमाता जिजाऊ व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निम्मित संत ज्ञानेश्वर शाळेतील विद्यार्थिनी राजेश्वरी होणे नी राजमाता जिजाऊंची वेशभूषा केली तर आलिया इनामदारने राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केली तसेच श्रद्धा शिंदे,नारायणी शिंदे,भक्ती देवडे व साक्षी सानप यांनी जिजाऊ व राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे